सोलापूर- हैद्राबाद महामार्गावर नळदुर्ग जवळ भीषण अपघात ट्रकने मोटर सायकलस्वारास चिरडले, एक जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी
नळदुर्ग :- नळदुर्ग - सोलापूर या राष्ट्रीय महामार्गवर दि,१४ रोजी सांयकाळी 6 वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून एक जण जखमी झालाय. दयानंद पंडित भोसले असं मयताचे नाव असून अणदूर ता. तुळजापूर येतील तो रहिवाशी आहे.
याबाबत, मिळालेल्या माहिती नुसार दयानंद पंडित भोसले हा नळदुर्ग वरून अणदूरकडे जातं असताना पाठीमागून येणारी व सोलापूर च्या दिशेने जाणाऱ्या मालवाहतूक ट्रॅकने त्यास जोराची धडक दिली. त्यात तो खाली पडल्याने त्याच्या अंगावरून ट्रकचे मागील टायर गेल्याने त्याचा जागीच चिरडून मृत्यू झाला. तर त्याच्या सोबत पर्वास करणारा दुसरा व्यक्ती हा ट्रकच्या धडकेने बाजूला उडून पडल्याने तोही जखमी झालाय.
महामार्ग पोलीस यंत्रणा ही गेल्या काही दिवसापासुन या भागात दिसून येत नसल्याने वाहन चालक बेदारकार पणे वाहणे चालवीत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून की काय अशा अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना पहावयास मिळत आहे. तुळजापूर तालुक्याचे विद्यमान आमदार राणा जगजीतसिहं पाटील यांनी महामार्ग पोलिसांना महामार्गावर न थांबन्याच्या सूचना दिल्याने या पोलिसांनी आपले ठिकाण बदल्ल्याची माहिती मिळतेय. त्याचाच हा अपघात परिणाम असल्याचे नागरिकांतून बोलले जातेय.
मागील काही आठवड्यापूर्वीच याच महामार्गवर एका तरुणांचा अशाच प्रकारे अपघात झाला होता. त्याचाही अशाच तर्हेने मृत्यू झाला होता त्या वेळीच नळदुर्ग करात या घटनेचे पडसाद उमटण्या पूर्वीच नळदुर्ग पोलिसांनी बाह्यवळण रस्ता तातडीने सुरु करण्याचे आश्वासन देऊन वातावरण शांत केले होते. त्या घटनेच्या स्मृती अजून विरतात ना विरतात तोच पुन्हा तशाच घटनेची पुनरावृत्ती झाल्याने संताप व्यक्त केला जातं आहे.
नळदुर्ग पोलीस, महामार्ग यंत्रणा, महामार्ग ठेकेदार अजून अशा कितीजनाच्या मृत्यूची वाट पाहत आहेत असा संतृप्त सवाल नागरिकांतून विचारला जातं आहे.
0 Comments