Hot Posts

6/recent/ticker-posts

गतवर्षीचा खरीप पिक विमा मिळणार कधी ? प्रशासनाने तातडीने निर्णय घेण्याची शेतकऱ्यातून होते मागणी

गतवर्षीचा खरीप पिक विमा ३२ महसूल मंडळांना मिळणार कधी ?
प्रशासनाने तातडीने निर्णय घेण्याची शेतकऱ्यातून होते मागणी

धाराशिव : खरीप हंगाम पीक लागवडीनंतर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीकडे पिक विमा भरलेला आहे मात्र गतवर्षी 2024 च्या पिक विमा अजूनही मिळालेला नाह तो कधी मिळणार असा सवाल शेतकऱ्यातून उपस्थित केला जात आहे प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना पिक विमा मिळवून द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

सततच्या पावसाने सोयाबीन कपाशी बाजरी अशा अनेक पिकांचे नुकसान होऊन विशेषता सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने सोयाबीन व इतर पिकाचे 25 टक्के पेक्षा अधिक नुकसान झाल्याने शासनाने नमुना सर्वे पंचनामा करून या संबंधातील मदती ने अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर प्राप्त होत आहेत त्याचवेळी अग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीच्या नियमाप्रमाणे बहुतांश शेतकऱ्यांनी वैयक्तिक तक्रारी करून कंपनीच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष पाहणी करून गेलेले आहेत तरी अद्याप शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम मिळालेली नाही या अनुष्काळीकडे एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीकडून पीडीत शेतकऱ्यांची कोणतीच दखल घेतली नसल्याने असंतोष वाढत आहे याविषयी जनप्रतिनिधी कोणतीच भूमिका घेत नसल्याने पिक विमा कंपनीवर वचक नसल्यानेच शेतकऱ्यावर अन्याय होत असल्याची भावना आहे. शासनाच्या वतीने एक रुपया पिक विमा या योजनेत शासन विमा कंपनीला शासनाचा व शेतकऱ्यांचा हिस्सा कोटेवाडी रुपये देत आहे पिकांचे नुकसान होऊन देखील विम्याचे पैसे शेतकऱ्यांना देण्यात एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी एवढा विलंब का करत आहे? असा असा प्रश्न शेतकरी बांधव उपस्थित करत आहेत. या प्रकरणी लोकप्रतिनिधी कंपनीच्या संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी तात्काळ लक्ष देऊन शेतकऱ्यांना पिक विमा मिळवून द्यावा अशी मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments