Hot Posts

6/recent/ticker-posts

मौजे येवती येथे शिव जन्मोत्सवा निमित्त सोमवार दि.२४ फेब्रुवारी रोजी प्रा. वसंत हंकारे यांचे " न समजलेले आई बाप " या विषयावर व्याख्यान.

तुळजापूर तालुक्यातील येवती येथे शिवजन्मोत्सवा निमित्त  दि २४ फेब्रुवारी रोजी प्रा. वसंत हंकारे यांचे " न समजलेले आई बाप " या विषयावर व्याख्यान.


"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

सायंकाळी ७ ते ११ या वेळेत होणार व्याख्यान गाव परिसरातील शिवप्रेमीनी उपस्थित रहावे.

"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

इटकळ ( दिनेश सलगरे ):- तुळजापुर तालुक्यातील मौजे येवती येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सार्वजनिक शिव जन्मोत्सव सोहळा दि.१९ ते २५ फेब्रुवारी दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन शिवप्रेमी ग्रामस्थांकडून करण्यात आलेले आहे. आजच्या या धगधगत्या व्हॉट्स अप फेसबुक च्या जमान्यात आजची तरुण पिढी ही एकलकोंडी झाली असून आई वडिलांपासून ही दूर होत आहे आई वडिलांचे कष्ट मुला बद्दलची तळमळ ही आजची मुलं मुली जुमानत असल्याचे दिसून येत आहे.आई वडीलाविषयी आपुलकी जिव्हाळा निर्माण व्हावा आई वडिलांचे स्थान आपल्या जीवनात खूप मोठे आहे याची जाणीव व्हावी यासाठी सोमवार दि.२४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ ते ११ दरम्यान आपल्या सुमधून व्याख्यानातून समाज प्रबोधन करणारे सांगली येथील प्रा. श्री. वसंत हंकारे यांचे न समजलेले आई बाप या विषयावर व्याख्यान होणार आहे. तर मंगळवार दि.२५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ ते ११ या वेळेत विनोदी जुगलबंदी भारुड सादर होणार आहे भारुड सादरीकरणासाठी सांगोला येथील प्रसिध्द भारुडकार संदिप मोहिते विरुद्ध जत येथील भारुडकार आण्णा चव्हाण यांच्यात जुगल बंदी होणार आहे. तरी या सार्वजनिक शिव जन्मोत्सव सोहळ्यातील व्याख्यान व भारुडाचा लाभ पंचक्रोशीतील परिसरातील सर्व  शिवप्रेमी ग्रामस्थ बंधू भगिनींनी लाभ घ्यावा असे आवाहन येवती येथील सार्वजनिक शिव जन्मोत्सव समितीच्या वतीने प्रसिध्दी पत्रकान्वये करण्यात आलेले आहे.

Post a Comment

0 Comments