Hot Posts

6/recent/ticker-posts

मौजे दिंडेगाव येथील सदगुरू शिवराम बुवा यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न

मौजे दिंडेगाव येथील सदगुरू शिवराम बुवा यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न.


"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

जुन्या परंपरा जपत बैल गाडीतून ही भाविक सद्गुरू शिवराम बुवा दर्शनासाठी आले.


""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

तीन दिवसीय यात्रा कालावधीत लाखो भाविकांनी घेतले सद्गुरू शिवराम बुवा महाराज यांचे दर्शन.

"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

इटकळ( दिनेश सलगरे ):- तुळजापुर तालुक्यातील मौजे दिंडेगाव येथील श्री संत सद्गुरू शिवराम बुवा महाराज यांची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न. हभप. आप्पासाहेब महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने यात्रेची सांगता करण्यात आली.बुधवार दि.२६ फेब्रुवारी रोजी सद्गुरू शिवराम बुवा यात्रेस प्रारंभ झाला तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम राबवण्यात आले. शुक्रवार दि.२८ फेब्रुवारी यात्रेचा मुख्य दिवस असल्याने सकाळ पासूनच भाविक सद्गुरू शिवराम बुवा महाराज यांच्या दर्शनासाठी दिंडेगाव कडे येत होते जुनी परंपरा जपत केशेगाव येथील सधन शेतकरी शिवराज साखरे यांनी सह कुटुंब बैल गाडीतून सद्गुरू शिवराम बुवा महाराज यांच्या दर्षणानासाठी आले यावेळी प्रत्येक जण मोठ्या उत्सुकतेने व कुतूहलाने बैल गाडीकडे पाहत होते. दुपारी २: ३० वाजता सद्गुरू शिवराम बुवा महाराज मंदिरासमोर प्रतीवर्षा प्रमाणे हभप आप्पासाहेब महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले व महा प्रसादा नंतर यात्रेची सांगता करण्यात आली. यावर्षी सद्गुरू शिवराम बुवा महाराज यात्रेस भाविक खूपच मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या तीन दिवस यात्रा कालावधीत जवळपास लाखो भाविकांनी सद्गुरू शिवराम बुवा महाराज यांचे दर्शन घेतले. यात्रा शांततेत व सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी इटकळ आऊट पोस्टचे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीपान कोळी त्यांचे सहकारी व पोलीस पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Post a Comment

0 Comments