मौजे दिंडेगाव येथील सद्गुरू शिवराम बुवा महाराज यात्रेस मोठ्या उत्साहात महाशिवरात्रीस प्रारंभ.
""""""""""""""""""""""""""""""""""'"""""""""""महाशिवरात्रीस हजारो भाविकांनी घेतले सद्गुरू शिवराम बुवा महाराज यांचे दर्शन.""""""""'"'"""""""""'"''""""'"'"""""""""""""""
शुक्रवार दि.२८ फेब्रुवारी रोजी हभप.आप्पासाहेब महाराज दिंडेगावकर यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसाद."""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
इटकळ (दिनेश सलगरे):- तुळजापूर तालुक्यातील मौजे दिंडेगाव येथील ग्रामदैवत श्री सद्गुरू शिवराम बुवा महाराज यात्रेस बुधवार दि.२६ फेब्रुवारी महाशिवरात्री रोजी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला . सकाळ पासूनच भाविकांनी दर्शनासाठी मंदिर परिसरात उपस्थिती दर्शवली अगदी रांगेत व शिस्तीत सर्व भाविकांनी दर्शन घेतले.मंदिर समितीचे सेवक व पोलीस यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.शुक्रवार दि.२८ फेब्रुवारी रोजी दुपारीहभप आप्पासाहेब महाराज दिंडेगावकर यांचे काल्याचे किर्तन व महाप्रसादाचे वाटप होणार आहे. रामकृष्ण हरीच्या जय घोषा ने अवघा परिसर दणाणून गेला.प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी श्री संत सद्गुरू शिवराम बुवा महाराज यांची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात येणार असून तीन दिवस ही यात्रा संपन्न होत असून या सद्गुरू शिवराम बुवा महाराज यात्रेस तुळजापुर उमरगा कळंब भुम अक्कलकोट सोलापूर धाराशिव मोहोळ लोहार औसा निलंगा लातूर आदि भागातून बहुसंख्य वारकरी भाविक भक्त या यात्रेस उपस्थित राहतात त्यामुळे श्री संत सद्गुरू शिवराम बुवा महाराज यांची यात्रा ही ग्रामीण भागात खूप मोठ्या प्रमाणात भरते. यात्रेकरू भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी मंदिर कमिटी व ग्रामपंचायतच्या वतीने पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. परिसरातील जवळपास ४० ते ५० दिंड्या उपस्थित राहतात टाळ मृदंग व रामकृष्ण हरी च्या जय घोषात वारकरी तल्लीन होतात.ग्रामीण भागातील ही यात्रा म्हणजे प्रति पंढरपूर समजले जाते तरी भाविकांनी या यात्रेतील धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आलेले आहे.
0 Comments