धाराशिव (उस्मानाबाद) जनता सहकारी बँक शाखा परंडा व महाराष्ट्र ग्रामीण बॅक शाखा परंडा च्या वतीने मुंबई पोलीस निवड झाल्याबद्दल परंडा येथे सत्कार
परंडा प्रतिनिधी -- परंडा तालुक्यातील भोञा गावाचे शेतकरी पुञ कु प्रविण बाबुराव पवार भोञा यांनी प्रतिकुल परस्थिती मध्ये जिद्द चिकाटी मेहनतीच्या जोरावर मुंबई पोलीस निवड फेब्रुवारी 2025 मध्ये महाराष्ट्रात 15 वा क्रमांक पटकावत यश संपादन करून आई -वडिलांचे स्वप्न पूर्ण केले कु. प्रविण पवार हा माढा तालुक्यातील केवड येथील आश्रम शाळेत 5 वी 12 वी शिक्षण पूर्ण करून नंतर बार्शी येथील शिवाजी महाविद्यालय मध्ये शिक्षण पूर्ण केले नंतर परंडा येथील क्रांती करीयर ॲकॅडमी चे संचालक प्रा. श्री विकास काळे सर व फिजिकल विभाग चे शिक्षक श्री धनंजय आडगळे सर यांच्या माध्यमातून सराव अभ्यास तयारी करत पोलीस भरती ची तयारी केली विशेष म्हणजे मुंबई सारख्या शहरात वयाच्या 23 व्या वर्षी व पहिल्या च पोलीस भरती मध्ये शानदार कामगिरी करत यश संपादन केले. कु प्रविण चे विशेष कौतुक करीत
मुंबई पोलीस निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र ग्रामीण बॅक शाखा परंडा व धाराशिव (उस्मानाबाद) जनता सहकारी बँक शाखा परंडा च्या वतीने कु. प्रविण बाबुराव पवार भोञा यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जनता बॅक शाखा अधिकारी श्री मुंडे साहेब व बॅक कर्मचारी श्री देशमाने साहेब व श्री वाघमोडे साहेब व ॲडव्होकेट श्री हरीचऺद्र सुर्यवंशी साहेब व तसेच महाराष्ट्र ग्रामीण बॅक शाखा अधिकारी श्री शेळके साहेब व श्री बॅक अधिकारी श्री मस्तुद साहेब व मजुर सहकारी संस्थेचे चेअरमन श्री सुनिल भाऊ पवार भोञेकर) व शकऺर पवार व श्री बाबुराव पवार व श्री सोपान पवार व दोन्ही बॅक मधील कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments