Hot Posts

6/recent/ticker-posts

भक्ती मोहिते अबॅकस स्पर्धेत भारत देशात तिसरी

 भक्ती मोहिते अबॅकस स्पर्धेत भारत देशात तिसरी 



तुळजापूर प्रतिनिधी: ३१ जानेवारी २०२५ रोजी कोल्हापूर येथे प्रोऍक्टिव्ह अबॅकस नॅशनल काॅम्पिटिशन संपन्न झाली. या स्पर्धेत कळंब येथील ब्रेन मास्टर प्रोऍक्टिव्ह अबॅकस सेंटरच्या माध्यमातून ऑनलाईन अबॅकस शिकणारी इयत्ता ४ थी ची विद्यार्थीनी भक्ती मोहिते हिने अबॅकस स्पर्धेमध्ये लहान गटात भारत देशात ३रा क्रमांक पटकावला. भक्ती मोहिते हिने ४ मिनिटे 35 सेकंदात १०० गणिते अचूक सोडवले या स्पर्धेत देशातील राजस्थान, कर्नाटक, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिसा, छत्तीसगड, या राज्यंसह एकुण ६६०० विद्यार्थीनी सहभाग नोंदवला होता. तिच्या यशाबद्दल प्रो ऍक्टिव्ह अबॅकस चे संचालक गिरीश करडे व संचालिका सारिका करडे , तेजस्विनी सावंत यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन भक्ती मोहिते सन्मानित करण्यात आले. भक्ती मोहिते हिने डिसेंबर २०२४ मध्ये झालेल्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवून जानेवारी २०२५ या नॅशनल स्पर्धेसाठी पात्र होऊन नॅशनल अबॅकस स्पर्धेत देशात तिसरा क्रमांक मिळवला. भक्ती मोहिते .वडील दादासाहेब मोहिते

ज्योती मोहितेया यशामध्ये सिंहाचा वाटा आहे  घोडदौड पाहून तुळजापूर तालुक्यात सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. भक्ती मोहिते हिला ब्रेन मास्टर प्रोऍक्टिव्ह अबॅकस सेंटर कळंब च्या संचालिका प्रा .सौ. रेशमा सावंत (शिनगारे )मॅडम प्रा.डॉ.संजय सावंत तसेच तिचे आई -वडील यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच कळंब येथील ब्रेन मास्टर प्रोऍक्टिव्ह अबॅकस सेंटरला विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश, विद्यार्थ्यांची प्रगती, वर्षभरातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता, पाहून या कॉम्पिटिशन मध्ये भारत देशातून सहभागी झालेल्या २१० अबॅकस सेंटर मधून दिला जाणारा मोठा आणि मानाचा *'बेस्ट सेंटर अवॉर्ड'* ब्रेन मास्टर प्रोऍक्टिव्ह अबॅकस कळंब ला मिळाला असून त्याबद्दल ब्रेन मास्टर प्रो ऍक्टिव्ह अबॅकसच्या संचालिका प्रा. सौ. रेशमा सावंत (शिनगारे) यांचा प्रोऍक्टिव्ह अबॅकस चे सर्वेसर्वा गिरीश करडे सर यांनी हा अवार्ड देऊन सन्मान केला.

Post a Comment

0 Comments