तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील पाटील विद्यालयात हळदी -कुंकू कार्यक्रम उत्साहात
चिवरी : तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील दत्तू पाटील (अण्णा) माध्यमिक विद्यालयामध्ये दि,४ रोजी संस्थेच्या अध्यक्षा सौ. मनीषा पोपटराव पाटील यांच्या वतीने आयोजित हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गीतावर नृत्य सादर केले तर महिलांसाठी मनोरंजनात्मक संगीत खुर्ची खेळ आयोजित केला होता. यामध्ये विजेत्या महिलांना सौ.पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी सौ.पाटील यांनी विद्यार्थी, महिलांशी विविध विषयावर संवाद साधला. या कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती एल.के बिराजदार,सहशिक्षीका श्रीमती.ढगे, विद्यालयातील सर्व कर्मचारी, विद्यार्थी ,महिला ,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments