Hot Posts

6/recent/ticker-posts

Beed :पवन ऊर्जा प्रकल्पाला पोलीस संरक्षण; शेतकऱ्याचे काय ?

Beed :पवन ऊर्जा प्रकल्पाला पोलीस संरक्षण; शेतकऱ्याचे काय ?

शेतात तार ओढण्यास विरोध करणाऱ्या शेतकरी पुत्रास पोलिसांनी डांबून ठेवले


बीड : मुख्यमंत्र्याच्या निर्देशानुसार पवन ऊर्जा प्रकल्पांच्या उभारणी कामांना पोलीस संरक्षण दिले जात आहे. स्थानिक प्रशासन आणि प्रकल्प उभारणी करणाऱ्या कंपनीची सरकारी आशीर्वादाने मोगलाई सुरू आहे पाटोदा तालुक्यातील बेनसुर येथे रेणू पावर कंपनीच्या लोकांनी मोबदला न देता शेतावरून तार ओढत होते पोलीस संरक्षणात सुरू असलेल्या या कामास शेतकऱ्यांनी विरोध केला या शेतकऱ्याचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी पोलिसांनी शेतकऱ्याचा मुलगा आणि जावयास पोलीस गाडीमधून नेऊन लॉकअप मध्ये डांबून ठेवले. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली रेणू पावर कंपनीचे पवनचक्की प्रकल्प बेनसूर आणि परिसरात उभारण्यात आलेले आहेत या पवनचक्क्यामध्ये निर्माण होणारी वीज धनगर जवळका येथील रेणू कंपनीच्या 220 केवी उपकेंद्रापर्यंत वाहून नेण्यासाठी टॉवर उभारणी करण्यात आलेली आहे. धनगर जवळक्याचे उपकेंद्र शासनाच्या तलावासाठी संपादित जमिनीवर उभारले आहे हे विशेष.

शुक्रवारी बेनसुर शिवारात उभारण्यात आलेल्या टॉवरवर वीज वाहक तारा जोडण्याचे काम करण्यात येत होते. रेणु कंपनीने या कामात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून सशुल्क पोलीस संरक्षण घेतलेली आहे बापू बंकट आरसुळ गट क्रमांक 45 आणि राजाभाऊ दशरथ सगरे यांच्या शेतावरून ही तार ओढली जाणार असल्याने कंपनी कामगार अधिकारी आणि पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला होता. बापू बंकट शिंदे यांनी त्यांना कंपनीने मोबदला दिला नसल्याने काम करू नका अशी विनंती संबंधितांना केली. मुलगा नारायण आरसुळ आणि जावई मयूर भाऊसाहेब झोडगे यांनी काम करू नका म्हणून सांगितले यावेळी घटनास्थळी बाचाबाची झाली पोलिसांनी नारायण अडसूळ आणि मयूर झोडगे याला मोगलाई थाटात पोलीस गाडीमध्ये बसून पाटोदा पोलीस ठाण्यात आणून डांबुन ठेवले.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ६ मार्च रोजी म्हणजे गुरुवारी बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना लेखी पत्र देऊन पवन ऊर्जा प्रकल्प उभारणीच्या कामात असलेल्या अडचणी अडथळे तातडीने दूर करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत या पत्रामध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासंदर्भात चकार शब्दही लिहिलेला नाही. आणि शुक्रवारी या निर्देशाची अंमलबजावणी करताना शेतकऱ्यांवर मात्र मोगलाई झाल्याचे समोर येत आहे प्रकल्प उभारणी करणाऱ्या कंपन्या विना अडथळा काम करण्यासाठी पोलीस  संरक्षण पोलीस अधीक्षकाकडून घेत आहेत.

पोलीस अधीक्षक संबंधित ठाणे प्रमुखांना बंदोबस्त पुरवण्याचे आदेश देतात असे आदेश देताना ज्या ठिकाणी काम आहे त्या ठिकाणच शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत का? संबंधितांना शासनाने ठरवून दिल्यानुसार मोबदला दिलेला आहे का ? याची शहानिशा न करताच पोलीस संरक्षण देत असल्याचा प्रकार बनसोड प्रकरणावरून समोर येत आहे .

पवनचक्की प्रकल्पाच्या लोकांना प्रशासनाचे आणि आता तर थेट मुख्यमंत्र्याची अभय आहे सामान्य शेतकऱ्यावर दंडेलशाही सुरू आहे अडाणी शेत खरी या बाबत आवाज उठवू शकत नाही सरकार पोलिसांचा वापर मोगलाईत काम करत कंपन्यांना फायदा पोहोचवत आहे.

डॉक्टर गणेश ढवळे सामाजिक कार्यकर्ता.

Post a Comment

0 Comments