Hot Posts

6/recent/ticker-posts

मौजे इटकळ येथील आदीबा सिराज मुजावर या सहा वर्षीय चिमुकलीने केला पहिलाच रोजा उपवास.

मौजे इटकळ येथील आदीबा सिराज मुजावर या सहा वर्षीय चिमुकलीने केला पहिलाच रोजा उपवास.

"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""


दिवसभर उपवासी राहत सायंकाळी नमाज अदा करून सोडला रोजा उपवास.

"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

इटकळ(दिनेश सलगरे):- तुळजापुर तालुक्यातील मौजे इटकळ येथील आदिबा सिराज मुजावर या सहा वर्षीय चिमुकलीने केला पहिलाच रोजा उपवास. मुस्लिम बांधवांचा रमजान हा पवित्र महिना समजला जातो आणि अशा या पवित्र रमजान महिन्यास रविवार दि.२ मार्च रोजी प्रारंभ झाला. या महिन्यात तमाम मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहाने व धार्मिक परंपरा जपत हा एक महिन्याचा रोजा उपवास करतात. पहाटे सहेरी केल्या नंतर दिवसभर न खाता पाणी ही न पिता हा उपहास करून सायंकाळी नमाज अदा करून उपहास सोडतात. मौजे इटकळ येथील सहा वर्षीय लहान चिमुकली आदीबा सिराज मुजावर हिने ही आई वडिलांना रोजा उपवास करणार असल्याचे सांगितले आई वडिलांनाही संमती दिली आणि आदीबा मुजावर हिने सकाळी सहेरी करून नमाज अदा केला आणि दिवसभर काहीही न खाता पिता उपवासी राहत सायंकाळी  नमाज अदा करून घरातील सर्व परिवारासह उपहास सोडला. सध्या उन्हाचा वाढता पारा दिवसभर बाहेर फिरणे मुश्किल वाटत असताना या सहा वर्षीय आदीबा सिराज मुजावर या लहान चिमुकलीने पवित्र अशा रमजान महिन्यातील पहिलाच रोजा मोठ्या उत्साहाने आनंदाने केला असल्याने ग्रामस्थांतून कौतुक केले जात आहे.*

Post a Comment

0 Comments