Hot Posts

6/recent/ticker-posts

मौजे फुलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.

मौजे फुलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.


--------------------------------------------

इटकळ (दिनेश सलगरे):- जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलवाडी शाळेतील सर्व महिला शिक्षिका भगिनी श्रीम. तोलन दणाने, श्रीम.सुनिता.ढेपे, श्रीम. दीपमाला खडके,स्वयंपाकीण ताई श्रीम. गुरुबाई लंगडे,अंगणवाडी कार्यकर्त्या श्रीम.मंगल जेठे  व मदतनीस सौ.सुरेखा हिप्परगे यांचा शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या हस्ते महिला सन्मानार्थ यथोचित सत्कार करण्यात आला.

समग्र शिक्षा योजनेच्या राष्ट्रीय आविष्कार अभियान उपक्रमांतर्गत  राज्याबाहेरील अभ्यास सहल बैंगलोर (कर्नाटक राज्य) येथे दि.27/02/2025 ते 03/03/2025 रोजी आयोजित करण्यात आली होती. या अभिनव उपक्रमात  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलवाडी ता.तुळजापूर शाळेतील इयत्ता सातवीतील गुणवंत विद्यार्थीनी लावण्या बाळू जाधव हिची निवड झाली होती. हीअभ्यास सहल यशस्वीपणे पूर्ण करून  आल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री.धुळाप्पा शिदोरे व इतर शिक्षक वृंदांच्या हस्ते लावण्या बाळू जाधव या गुणवंत विद्यार्थिनीचा यथोचित सत्कार करण्यात आला.

इयत्ता आठवीतील एन.एम. एम.एस.परीक्षेतील पात्र  विद्यार्थी साईराज सचिन भोळे, चेतन चंद्रकांत चव्हाण व अमित विठ्ठल जाधव या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मुख्याध्यापक व सर्व शिक्षक स्टाफ यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन मुख्याध्यापक श्री धुळाप्पा शिदोरे यांनी केले. सूत्रसंचालन श्री.सुरेश भोळे यांनी केले व आभार श्री. आप्पासाहेब झाडबुके यांनी मानले.

राज्याबाहेरील अभ्यास सहलीसाठी जिल्ह्यातून एकूण ४५ विद्यार्थ्यांची निवड झाली. या विद्यार्थ्यांपैकी फुलवाडी शाळेतील लावण्या बाळू जाधव हिची निवड झाली याबद्दल व एन.एम.एम.एस परीक्षेत विद्यार्थी पात्र  झाल्याबद्दल तुळजापूर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी श्री.अर्जुन जाधव, माजी गटशिक्षणाधिकारी श्रीम. मेहरुनीसा इनामदार, अणदूर बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री.तात्यासाहेब माळी अणदूर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.परशुराम कानडे व अणदूर बीट मधील सर्व शिक्षकांनी शाळेचे भरभरून कौतुक व अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments