Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर :येथे महापोलीस मित्र संघ यांच्यावतीने जागतिक महिला दिन साजरा

तुळजापूर येथे महापोलीस मित्र संघ यांच्यावतीने जागतिक महिला दिन साजरा 


तुळजापुर: महापोलीस मित्र संघ तुळजापूर यांच्यावतीने दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी बोलताना महापोलीस मित्र संघ संस्थापक अध्यक्ष अनिता लष्करे बोलताना म्हणाले की ,महीलांना मार्गदर्शन करताना माझ्या या समाज कार्याला आज 7 वर्ष पूर्ण झाले....मलाच माहीत नव्हत महीला जागतिक दिन म्हणजे काय खुप वाटायच की आपण ही बाहेर पडायच आणी स्वाताची एक ओळख निर्माण करायची ते आज दक्षता कमीटी पोलीस स्टेशन समाज कार्य तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष फिल्ड वर्क आशा बर्याच क्षेत्रात काम करत करत आज महा पोलीस मित्र संघ संस्थापक अध्यक्ष पदा पर्यंत  प्रवास चालू आहे ...आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने माझ्या सर्व महिलांनी एकच सांगायच आहे न घाबरता पुढे जायच आपणच आपल अस्तित्व निर्माण करायच कारण आजच्या काळात स्वताच रक्षण करण हिच आपली ताकद आहे कोनावर ही आंवलबुन राहण्या पेक्षा स्वता  लढा  एक दिवस नक्कीच यश तुम्हाला मिळेल ....बघीतलेल स्वप्न पुर्ण होत नाही...तोपर्यंत माघार घ्यायच नाही असे मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी महा पोलीस मित्र संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments