विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच मुख्याध्यापकाची विष प्राशन करून आत्महत्या
नांदेड: शहरापासून जवळच असलेल्या शाळेतील विद्यार्थिनीच्या मोबाईलवर असशील चाळे केल्याचे आरोपावरून मुख्याध्यापकाविरुद्ध गुरुवारी रात्री शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्याध्यापक सुनील भानुदास राव कारामुंगे वय (48) यांनी विष प्राशन केल्याने त्याला उपचारासाठी खाजगीर होणाऱ्या दाखल केली होती मात्र उपचार सुरू असताना शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला.
शहरातील एका उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या व दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला बोर्डाच्या परीक्षेमध्ये मार्क वाढवून देतो असे प्रलोभन देऊन काही दिवसापूर्वी मुख्याध्यापकाने फोन केला त्यानंतर व्हाट्सअप द्वारे कॉल करून सदरील विद्यार्थिनी सोबत असशील चाळे करण्यात आले. त्यामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनी ही माहिती कुटुंबीयांना सांगितले. कुटुंबीयांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन थेट पोलीस ठाणे गाठले तेव्हा गुन्हा दाखल करून देण्यासाठी काही मंडळी कडून या कुटुंबावर दबाव टाकण्यात आला. मात्र सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ जैन व त्याच्या साथीदाराने कुटुंब मागे खंबीर साथ देत गुन्हा दाखल करण्यासाठी पाठबळ दिले. यानंतर कुटुंबाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान मुख्याध्यापक सुनील भानुदासराव कारामुंगे वय 48 यांना गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच बदनामीच्या भीतीने विष प्राशन केले. त्याला शहरातील एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचार सुरू असताना शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक सुशील कुमार नाईक घटनास्थळी दाखल झाले. शिक्षकाच्या आत्महत्या नंतर कुटुंबियांनी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान खात्रीलायक सूत्रानुसार दिलेल्या माहितीनुसार या मुख्याध्यापकाने आपल्या संदर्भाने चिठ्ठी लिहून ठेवण्यात आली आहे.
0 Comments