Hot Posts

6/recent/ticker-posts

मौजे सराटी येथे श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व रामकथेस शनिवार दि.१५ मार्च रोजी प्रारंभ.

मौजे सराटी येथे श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व रामकथेस शनिवार दि.१५ मार्च रोजी प्रारंभ.

""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""


पारायण सोहळ्यात यावर्षी प्रथमच दररोज सायंकाळी ४ ते ६ यावेळेत होणार रामकथा वाचन व निरूपण.

""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

शुक्रवार दि.२१ मार्च रोजी हभप.नितीन जगताप यांच्या काल्याच्या कीर्तनाने व हभप.आप्पासाहेब दिंडेगावकर यांच्या हस्ते काला वाटपाने होणार पारायणाची सांगता.

""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

इटकळ (दिनेश सलगरे):- तुळजापुर तालुक्यातील मौजे सराटी येथे प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी पंढरीरायाच्या व काशी विश्वनाथाच्या कृपेने व सीता माऊलीच्या आशीर्वादाने सद्गुरु शिवरामबुवा महाराज दिंडेगावकर यांच्या कृपेने व हभप.आप्पासाहेब महाराज दिंडेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली म शनिवार दि. १५ मार्च २०२५ ते २१ मार्च २०२५ या कालावधीत श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व रामकथा सोहळा संपन्न होणार आहे तरी गाव परिसरातील रामभक्त भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आव्हान असे सराटी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे. या पारायणाच्या अधिष्ठान पदी हभप.ज्ञानेश्वर माळी हे आहे. या सात दिवसातील दैनंदिन कार्यक्रम कार्यक्रम पहाटे ४ ते ५ काकडा भजन , सकाळी ६ ते ७ माऊलीची महापूजा , सकाळी ७ ते ९ ज्ञानेश्वरी पारायण , सकाळी ९ ते ९:३० मधली सुट्टी , सकाळी ९:३० ते ११:३०  ज्ञानेश्वरी पारायण ,  दुपारी १२ ते २  भोजन , दुपारी २ ते ४ गाथा भजन , सायंकाळी ४ ते ६  रामकथा वाचन निरूपण, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ , ७ ते ९ भोजन, रात्री ९ ते ११ किर्तन, रात्री ११ ते पहाटे ४ पर्यंत हरिजागर अशा पद्धतीने दैनंदिन कार्यक्रम आहेत.

 या पारायण सोहळ्यात हभ.प.अशोक महाराज यादव तुळजापूर , हभप. प्रभाकर वाकचौरे कामती ,  विठ्ठल महाराज  शंकर महाराज ,  हभप आकाश महाराज पाटील ,हभप.वैभव महाराज कानेगावकर यांची कीर्तनाची सेवा होणार आहे तर हभप. नितीन महाराज जगताप यांचे काल्याचे किर्तन व आप्पासाहेब महाराज दिंडेगावकर यांच्या हस्ते काला वाटप करण्यात येणार आहे. तरी गाव परिसरातील सर्व रामभक्त भाविक भक्तांनी या पारायण सोहळ्यातील कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सराटी ग्रामस्थांच्या वतीने प्रसिध्दी पत्रकान्वये करण्यात आलेले आहे.

Post a Comment

0 Comments