Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर: निलेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वयंशासन दिन व निरोप समारंभ उत्साहात साजरा

 विद्यार्थी बनले एक दिवसाचे शिक्षक

""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""" निलेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वयंशासन दिन व निरोप समारंभ उत्साहात साजरा


"""""""""""""""""""""""""""""""""""""""

इटकळ (दिनेश सलगरे):- विद्यार्थ्यांना शालेय प्रशासनाचा अनुभव यावा त्यांच्यात नेतृत्व गुण विकसित व्हावे यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निलेगाव तालुका तुळजापूर येथे स्वयंशासन दिन उत्साहात संपन्न झाला त्याचबरोबर आपल्या सहकारी बालमित्रांना शिकवण्याचा जो अनुभव मिळतो त्यातून त्यांना बरेच काही शिकायला मिळते हे आज त्यांनी अनुभवले.आजच्या या कार्यक्रम प्रसंगी निलेगाव गावचे विद्यमान सरपंच श्री शंकर जमादार साहेब उपसरपंच मोहसीन इनामदार साहेब शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समद पटेल साहेब शाळेचे मुख्याध्यापक श्री. शिवाजी जाधव साहेब शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती चौधरी मॅडम हे सर्वजण व्यासपीठावर उपस्थित होते .

सर्वप्रथम सातवीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या सात वर्षातील अनुभव काही मुलांनी सांगितले तदनंतर शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री परकाळे सर श्री सुतार सर श्री प्रकाश जाधव सर श्री गोरे सर श्रीमती कुलकर्णी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांच्या पुढील शैक्षणिक कामासाठी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी गावचे सरपंच श्री शंकर जमादार साहेब यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांना एक वही एक पेन असे 44 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. शाळेची आठवण रहावी म्हणून इयत्ता सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी मिळून शाळेसाठी सहा मजबूत खुर्च्या दिल्या कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गुरुलिंग ढावणे सर तर आभार प्रदर्शन श्री ढम्मे सर यांनी केले. अशा तऱ्हेने स्वयंशासन दिन व निरोप समारंभ कार्यक्रम उत्साहात साजरी करण्यात आली.

Post a Comment

0 Comments