पोटच्या मुलाचा खून करणाऱ्या पित्यास आजन्म कारावास हिंगोली जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील येडशी जिल्हा हिंगोली येथे डिसेंबर २०१८ मध्ये नेहमी आईचीच बाजू घेतोस मह्णुन स्वतःच्या मुलाचा गळफास देत दगडाने ठेचून खून केल्याप्रकरणी आरोपी पिता दोषी आढळल्याने हिंगोली येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सरोज एम माने गाडेकर यांच्या न्यायालयाने बुधवारी दिनांक 5 रोजी झालेल्या अंतिम सुनावणीत आजन्म करावास व 75 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
या घटनेची थोडक्यात हकीगत अशी की हिंगोली जिल्ह्यातील येडशी येथील बाबुराव भगवानराव शिखरे यांनी 28 डिसेंबर 2018 रोजी मध्यरात्री स्वतःचा 14 वर्षाचा मुलगा वैभव बाबुराव शिखरे यांचा खून केला होता वैभव नेहमी आईची बाजू का घेतो याचा राग मनात धरून त्यास झोपेतून उठून त्याला ऑटो रिक्षामध्ये बसून परिसरातील कुंभारवाडी शिवारात कुरतडीपाटी परिसरात नेले या ठिकाणी आरोपी बाबुराव शिखरे यांनी स्वतःच्या दोरीने वैभवला गळफास देऊन मारहाण केली. या मारहाणी नंतर देखील वैभव हालचाल करत असल्याने तो मेला नसल्याने आरोपी बाबुराव शिखरे यांनी त्याला रोडच्या बाजूला पडलेल्या दगड डोक्यात मारून ठार केले.
त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने त्याच्या स्वतःचा मुलगा वैभव चा मृतदेह पुन्हा ऑटो टाकला येडशी गावात येऊन तो मृतदेह अरविंद गणेशराव शिखरे यांच्या घरासमोरच्या पायऱ्यावर टाकला. याप्रकरणी अरविंद शिखरे यांच्या माहितीवरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नंबर 421/ 2018 मध्ये भारतीय दंड विधानसभेचे कलम 302 201 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
आरोपीच्या चेहऱ्यावर नव्हता पश्चाताप
🔴 हिंगोली जिल्हा हा प्रथम न्यायिक जिल्हा 25 फेब्रुवारी 2025 रोजी झाल्यानंतर नवीन इमारतीतून खुनासारख्या गंभीर होण्याची सुनावणी पार पडली .यात शिक्षा होऊन हा निर्णय म्हणजे पहिलेच आजन्म कारावासाची शिक्षा ठरली आहे. महत्त्वाचे म्हणजे वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष व फॉरेन्सिक लॅब चे पुरावे तपासी अमलदार यांनी केलेला तपास महत्त्वपूर्ण ठरला. आरोपीचे कृत्य अतिशय निंदनीय आहे त्याने स्वतःचा 14 वर्षाचा मुलाचं निग्रहण खून केला असून न्यायालयाने शिक्षा सुनावली तेव्हा आरोपीच्या चेहऱ्यावर कसलाही पश्चातापाचा भाव दिसून येत नव्हता.
आर्थिक दंडासह सर्व शिक्षा एकत्र भोगावे लागणार
🔴 तसेच या प्रकरणात इतर गुन्ह्यांसाठी आरोपीस 50 हजार रुपये दंडाची शिक्षा दंड न भरल्यास एक वर्षे सश्रम करावास घरासमोरील पायऱ्यावर मृतदेह टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन वर्षे सक्षम करावास व 25 हजार रुपये दंड दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.या दोन्ही शिक्षा आरोपीला एकत्र भोगाव्या असा आदेश देण्यात आला या प्रकरणात सरकार पक्षातर्फे एडवोकेट एन एस मुटकुळे यांनी बाजू मांडली त्यांना सरकारी वकील एसडी कुटे व एस एस देशमुख यांनी सहकार्य केले कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक टी एस गुहाडे सुनीता धनवे यांनी सहकार्य केले.
14 साक्षीदारांची तपासणी
🔴 प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक जी.एस राहिले व नितीन केंद्रे यांनी केला आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले या प्रकरणात सहा सरकारी वकील एन एस मुटकुळे यांनी एकूण 14 साक्षीदार तपासून युक्तीवाद केला यात फिर्यादी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रिया संजय नाकाडे व तपासी अमलदार जीएस राहिले व नियम केंद्रे यांची साक्षी महत्त्वपूर्ण ठरली या प्रकरणात आरोपी बाबुराव शिखरे दोषी आढळल्याने हिंगोली जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश सरोह माने गाडेकर यांच्या न्यायालयाने जीवे मारल्याप्रकरणी आज जन्म करावासाची शिक्षा ठोठावली आहे.
0 Comments