Hot Posts

6/recent/ticker-posts

थंड पेयाचे आमिष दाखवून महाराजाचा तीन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी विरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल-Posco Act

थंड पेयाचे आमिष दाखवून महाराजाचा तीन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी विरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल


लातूर: देवळी तालुक्यातील बोंबळी बुद्रुक येथील तीन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.थंड पेयाची आमिष दाखवून महाराज व एका मंदिराचा पुजारी असलेल्या एका नराधमाने हे दुष्कर्म केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की पीडित मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे की आरोपी अनिल व्यंकट लांडगे महाराज वय 57 राहणार बोंबळी बुद्रुक तालुका देवणी जिल्हा लातूर यांनी दिनांक 22 मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या मुलीसह इतर दोन मुलींना आपल्या दुचाकी वर बसवून शेतात नेले;त्यांना थंड पेय पाजून मोबाईल वरील अश्लील व्हिडिओ दाखवत छेडछाड केली याबाबत घरच्यांना काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली होती मात्र मुलींनी झालेली घटना रात्री आपल्या नातेवाईकांना सांगितली या प्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 102 / 25 अन्वे भारतीय दंड संहितेच्या कलम 74 75 351 (2) बी एन एस सह लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या कलम 8 व 12 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.तक्रारीनंतर दिनांक 27 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गोंड करत असून प्रभारी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री डोके यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

नाव महाराज गुण सैतानाचे

आरोपी अनिल लांडगे ची संबंध पंचक्रोशीत महाराज म्हणून ओळख आहे शिवाय तो एका मंदिराचा पुजारी असल्याचे सांगितले जात आहे त्याला महाराज याच नावाने संबोधले जाते मात्र त्याचे हे कृत्य समोर आल्याने नाव महाराज आणि गुण सैतानाचे असे बोलले जात आहे थंड पेयाची आमिष दाखवून त्यांनी अल्पवयीन मुली सोबत केलेला कर्त्याबद्दल रोष व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments