Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव जिल्ह्यात 31 टक्के रेशन कार्डधारकांची ई केवायसी बाकी, आता 30 एप्रिलची डेडलाईन, ई- केवायसी करण्याचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे आव्हान

धाराशिव जिल्ह्यात 31 टक्के रेशन कार्डधारकांची ई केवायसी बाकी, आता 30 एप्रिलची डेडलाईन, ई- केवायसी करण्याचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे आव्हान

धाराशिव: सार्वजनिक वितरण प्रणालीतील सर्व रेशन कार्ड धारकांची ई केवायसी (ration kyc)प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने आता 30 एप्रिल ची डेडलाईन दिली आहे .त्यामुळे त्यानंतर ई केवायसी न केलेल्या कार्डधारकांचा धान्य पुरवठा बंद करण्यात येणार आहे; आतापर्यंत 69 टक्के कार्ड धारकांनी ई-केवायसी पूर्ण केली असून अद्याप ३१ टक्के कार्डधारक बाकी आहेत त्यामुळे सर्व कार्डधारक लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी अशी आवाहन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केले आहे. रेशन कार्डधारकांना ई केवायसी पूर्ण करण्यासाठी यापूर्वी 31 मार्च ही अंतिम मुदत देण्यात आली होती मात्र जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 69 टक्के लाभार्थ्यांनीच ई- केवायसी केली असून उर्वरित 31 टक्के लाभार्थ्याची प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. ई केवायसी करण्यासाठी रेशन दुकानांमधील इ पॉश मशीनचा वापर करता येईल तसेच शासनाने मेरा इ केवायसी अँप आणि आधार फेस आरडी सर्विस ॲप सुरू केले असून मोबाईल तरीही सदरची प्रक्रिया पूर्ण करता येईल याचा लाभार्थ्यांनी फायदा घेऊन इ केवायसी पूर्ण करण्याची आव्हान जिल्हा प्रशासनाने केली आहे.

अशी करावी  इ केवायसी  प्रक्रिया(E-KYC ration process)

मोबाईल द्वारे ई केवायसी करण्यासाठी प्रथम गुगल प्ले स्टोअर वरून आधार फेस आरडी सर्विस ॲप्स अपलोड करावे त्यानंतर सदरील ॲप उघडून राज्य व ठिकाण निवडावे त्यानंतर आधार क्रमांक टाकून आलेला ओटीपी त्यात प्रविष्ट करावा त्यानंतर फेस इ केवायसी वर क्लिक करून सेल्फी कॅमेरा द्वारे चे हरा स्कॅन करावा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर यशस्वी ही केवायसी चा संदेश दिसेल सर्व रेशन कार्डधारकांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी अन्नधान्य वितरणात अडथळा येऊ नये याची दक्षता घ्यावी अशी आव्हान जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments