Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथील तरुण सरपंच मल्लिनाथ गावडे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर.

तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथील तरुण सरपंच मल्लिनाथ गावडे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर.

"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

मराठी सिने अभिनेते मा.मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते होणार १३ एप्रिल रोजी पुरस्कार प्रदान.


"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

इटकळ (दिनेश सलगरे):- तुळजापुर तालुक्यातील मौजे केशेगाव येथील कर्तव्यदक्ष तरुण सरपंच मल्लिनाथ गावडे यांना स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर झाला आहे.महाराष्ट्रातील सर्व सरपंचाच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असलेली राज्यातील नोंदणीकृत संघटना स्वराज्य सरपंच सेना संघ महाराष्ट्र राज्य  यांच्या वतीने केशेगाव येथील सरपंच मा. मल्लिनाथ आप्पाराव गावडे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर करण्यात आला ,  सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य आयोजित मान कर्तृत्वाचा सन्मान नेतृत्वाचा राज्यस्तरीय सन्मान सोहळा २०२५ विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी पुरस्काराने सन्मानित केले जाते याही वर्षी संघटनेच्या वतीने उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामीण भागातील आदर्श सरपंच यांचा सन्मान करण्यात येत आहे . गाव पातळीवर उत्कृष्ट कार्य करणारे सरपंच मल्लिनाथ गावडे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब पावसे पाटील यांनीनुकतेच दिलेले आहे.विश्वासाने आणि जिद्दीने आपले ध्येय साध्य करीत आहात आपल्या कार्यक्षेत्रामध्ये खंबीरपणे उत्तम कामगिरी करून समाजाचे कल्याण करण्यासाठी सतत धडपड करत आहात म्हणून आपणास आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे असेही दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.सरपंच सेवा संघाचे समर्थक बाबासाहेब पावसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच मराठी सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे  , ग्रामसेवक नेते एकनाथराव ढाकणे यांच्यासह दिग्गज मान्यवरांच्या शुभ हस्ते व यादवराव पावसे पाटील, रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा रविवार दिनांक १३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी अकरा वाजता माऊली संकुल सभागृह सावेडी रोड अहिल्यानगर येथे संपन्न होणार आहे. सरपंच मल्लिनाथ गावडे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर झाल्याने गाव परिसरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

0 Comments