Hot Posts

6/recent/ticker-posts

बस मध्ये मोफत योजनांचा लाभ घेण्यासाठी बोगस आधारकार्ड बोगस दिव्यांग ओळखपत्राचा वापर, धाराशिव जिल्ह्यातील चित्र यंत्रणेकडून तपासणी करण्याची गरज

बस मध्ये मोफत योजनांचा लाभ घेण्यासाठी बोगस आधारकार्ड बोगस दिव्यांग ओळखपत्राचा वापर, धाराशिव जिल्ह्यातील चित्र यंत्रणेकडून तपासणी करण्याची गरज


धाराशिव: शासनाने एसटी महामंडळात महिला वयोवृद्ध व दिव्यांगांना विविध सवलती दिली आहेत या सवलतीच्या माध्यमातून प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी यामध्ये मोठ्या प्रमाणात बोगसगिरी सुरू असल्याचे चित्र धाराशिव जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात दिसून येत आहे. या प्रकाराची यंत्रणे कडून चौकशी होणे गरजेचे असल्याची भावना सुजाण व दिव्यांग व्यक्तीकडून व्यक्त होत आहे.

बस प्रवासात सर्वाधिक मोफत सवलतीच्या दरात प्रवास होत आहे प्रवासात सर्वाधिक प्रवास करणारे प्रवासी हे दिव्यांग  कर्णबधीर असल्याचे बोगस ओळखपत्र काढून राज्यभर प्रवास करत आहेत तर कोणी बोगस आधार कार्ड पॅन कार्डचा प्रवासासाठी सर्रास वापर करत आहेत. बोगसगिरी करणाऱ्या प्रवाशावर कायदेशीर कारवाई केली तरच बोगसगिरी ला आळा बसणार आहे अन्यथा काही दिवसात बोगस प्रवाशांनी खचाखच प्रवासी बसलेली बसा पाहायला  मिळणार आहेत. वाढते डिझेलचे भाव त्यामुळे एसटी महामंडळाचा प्रवास महागला आहे दोन महिन्यापूर्वी तिकिटात वाढ केली त्यामुळे गोरगरीब प्रवाशांना प्रवास महागला सवलतीमुळे राज्यभर कोणी अर्धे कोणी एक चतुर्थ तर कोणी संपूर्ण मोफत प्रवास करत आहेत. शासकीय निम शासकीय व व्यापारी हे नोकरी काम धंदा साठी दररोज बसणे ये जा करतात भाडे वाढ झाल्यामुळे दररोज येतात खिशाला परवडत नाही त्यामुळे ते प्रवासात सवलती मिळावी यासाठी अव्वाच्या सव्वा पैसा खर्च करून कर्णबधिर दिव्यांग कार्ड तर कोणी बोगस आधार पॅन कार्ड काढत आहेत खरे व खोट्या कार्डचे प्रवासी हे सवलतीच्या दरात प्रवास करत असल्यामुळे प्रवाशाची तोबा गर्दी होत आहे. याप्रकरणी एस टी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बोगस सवलती घेणाऱ्या प्रवाशांना आळा घालावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

सर्वाधिक बोगस लाभार्थी

एस टी महामंडळाने प्रवासात खूप सवलती दिल्यामुळे महिला व वयोवृद्ध पुरुषांची प्रवासी संख्या जास्त वाढली आहे यात प्रवास करणाऱ्या सर्वाधिक महिला असल्या तरी 65 ते 75 ची व कर्णबद्ध दिव्यांगाची सवलत घेणारे बोगस कार्डधारक पुरुष असल्याचे वास्तव चित्र सध्या पाहायला मिळत आहे. विशेषता सर्वाधिक लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणावर बोगस लाभ घेत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे.

Post a Comment

0 Comments