Hot Posts

6/recent/ticker-posts

चिवरी परिसरात आढळलेला हिंस्र प्राणी वाघ नसून 'बिबट्या' असल्याचा वन विभागाचा खुलासा

चिवरी परिसरात आढळलेला हिंस्र प्राणी वाघ नसून 'बिबट्या' असल्याचा वन विभागाचा खुलासा


तुळजापूर:  तालुक्यातील चिवरी परिसरातील आढळलेला हिंस्त्र प्राणी वाघ नसून बिबट्या असल्याचा खुलासा तुळजापूर येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. चिवरी येथील मनोज आरगे यांच्या शेतामध्ये दिनांक १७ रोजी सायंकाळच्या सुमारास हिंस्र, प्राण्याचे दर्शन झाले होते. हा प्राणी प्रत्यक्ष दर्शनी बघणाऱ्या सात ते आठ नागरिकांनी वाघ असल्याचे सांगितले होते. मात्र  शेतकऱ्यांना दिसलेला ‘तो’ वाघ नसून बिबट्या असल्याचा प्रथम दर्शनी निष्कर्ष वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी काढला आहे.

 वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दि,१८ रोजी सदर शिवारात भेट देऊन पाहणी केली.पाऊलाचे ठसे पाहून त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे. तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील शेतकरी मनोज आरगे यांच्या शेताजवळ गुरुवार  दि.१८ रोजी सायं.७ ते ७:३० वाजेच्या दरम्यान शेतातील काम आटपून गावाकडे येत असताना त्यांना दहा ते पंधरा फुटावर हिंस्र प्राणी दिसल्याची माहिती ग्रामस्थांना दिली. त्यानंतर सदर ठिकाणी सात ते आठ ग्रामस्थांनी पाहणी केली असता त्यांना वाघ असल्याचे निदर्शनास आले असल्याचे गावकऱ्यांना माहिती सांगितली. या घटनेची माहिती पोलीस पाटील रुपेश बिराजदार यांनी वन विभागास कळवले, त्यानुसार  दि.१९ शुक्रवारी  सकाळी तुळजापूर येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी  सदरील ठिकाणी भेट देऊन पावलाच्या ठसे पाहणी केली. त्यात सदरील ठसे हे बिबट्याचे असल्याचे प्रथम दर्शनी निष्कर्ष वन अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच परिसरात परत बिबट्याचा वावर आढळल्यास वनविभागाच्या वतीने पकडण्यासाठी पिंजरे बसवण्यात येतील असे यावेळी सांगितले.मात्र, परिसरात पहिल्यांदा बिबट्या दिसल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावण निर्माण झालेले आहे. चिवरी परिसरात  बिबट्या आढळून आल्याने शेतकरी व  ग्रामस्थांनी सतर्क राहावे व काळजी घ्यावी असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments