Hot Posts

6/recent/ticker-posts

मुलानेच केला जन्मदात्या आईचा गळा आवळून खून; सोलापूर जिल्ह्यातील हृदय पिळवटून टाकणारी घटना

मुलानेच केला जन्मदात्या आईचा गळा आवळून खून; सोलापूर जिल्ह्यातील हृदय पिळवटून टाकणारी घटना


सोलापूर : सांगोला तालुक्यातील चिंचोली येथील सख्ख्या भावाने लहान भावाचा भोसकून खून केल्याची घटना ताजी असतानाच कडलास तालुका सांगोला येथील तुकाराम शहाजी साळुंखे या संशियत आरोपीने गुरुवार दिनांक १७  एप्रिल रोजी स्वतःच्या आईचाच केबलच्या साह्याने गळा आवळून निर्गुण खून केल्याची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे रतन शहाजी साळुंखे वय (५०) असे मृत  आईचे नाव आहे.

अज्ञात कारणावरून तुकाराम शहाजी साळुंखे या संशयित आरोपींनी बुधवार दिनांक १६ एप्रिल रोजी रात्री उशिरा ते गुरुवारी दिनांक १७ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजून 57 या मिनिटाच्या दरम्यान कडलास येथील गावात असणाऱ्या बौद्ध समाजाच्या समाज मंदिराच्या शेजारी आई रतन शहाजी साळुंखे हिचा केबलच्या साह्याने गळा वळून खून केला आणि मृतदेह समाज मंदिराच्या स्लॅबवर गळ्याला काळ्या रंगाची केबल गुंडाळलेल्या अवस्थेत सोडून दिले. विशेष म्हणजे संशयित आरोपी तुकाराम साळुंखे यांनी मयत रतन साळुंखे यांच्या घरापासून हे ठिकाण तब्बल तीन किलोमीटर अंतरावर आहे गुरुवारी सकाळी गावातील लोकांनी सदरचा मृतदेह पाहिला आणि यानंतर गावचे माजी सरपंच दिगंबर भजनावळे यांनी गावचे पोलीस पाटील रघुनाथ ननवरे यांना याबाबत कळवले पोलीस पाटील ननवरे यांनी तात्काळ घटनेची माहिती पोलिसांना कळवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली आणि याबाबत प्रथमदर्शी आकस्मित मृत्यू अशी पोलीस स्टेशनला नोंद झाली आहे माहित रतनशहाजी साळुंखे यांच्या मृतदेहाचे सेवाविच्छेदन करून काढलाच येते त्यांच्या पार्थिवरांच्या संस्कार करण्यात आले आणि संशयित तुकाराम सयाजी साळुंखे यांना ताब्यात घेतले रात्री उशिरा याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.

सांगोला तालुक्यात खुनाची मालिका थांबेना!

सांगोला तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे बुधवार दिनांक १६ एप्रिल रोजी चिंचोली येथे लहान भावाने मोठ्या भावाचा खून केल्याची घटना ताजी असताना मुलाने जन्मदात्या आईचा खून केल्याचा घटना घडल्याने  संपूर्ण तालुक्यातील जनता नाराजी व्यक्त करत आहे गेल्या काही महिन्यापासून सांगोला तालुक्यात सुरू असलेली खुनाची मालिका सञ  मात्र थांबण्याचे नाव घेत नाही.

Post a Comment

0 Comments