तुळजापूर : केशेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली वर्ग विद्यार्थी यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न.
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
इटकळ ( दिनेश सलगरे ):- तुळजापुर तालुक्यातील मौजे केशेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिलीच्या नवगत विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. मंगळवार दि.1 एप्रिल रोजी जि.प.प्रा.शाळा केशेगाव येथे इयत्ता पहिली विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला . याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्रीमती पुनम कोळी , निलूशा जळकोटे व सर्व सदस्य अंगणवाडी ताई विद्यार्थ्याचे माता पालक उपस्थित होते . पहिली प्रवेशपात्र विद्यार्थ्याना साखरेचे हार व बलून व पालकांना गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले . याप्रसंगी 26 विद्यार्थ्यांचे पहीली वर्ग प्रवेश घेण्यात आले व प्रत्यक्ष पहिलीच्या वर्गास सुरुवात झाली.
0 Comments