सोलापूर :महाविद्यालयीन विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या दयानंद महाविद्यालयातील वस्तीगृहातील घटना
सोलापूर: शास्त्र विभागात शिकत असलेल्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली स्नेहा सौदागर गायकवाड वय 17 राहणार तरटगाव तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर असे त्या विद्यार्थ्याची नाव आहे.शहरातील दयानंद महाविद्यालयातील वसतिगृह येथे मंगळवार दिनांक 22 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेमुळे नातेवाईकांनी तीव्र आक्रोश व्यक्त करत महाविद्यालयासमोर रस्ता रोको केला दरम्यान यापूर्वी महाविद्यालयात एका विद्यार्थिनी इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती गेल्या काही महिन्यातील ही दुसरी घटना असल्याचे सांगण्यात येत आहे.स्नेहा गायकवाड ही दयानंद महाविद्यालयाच्या शास्त्र विभागात इयत्ता अकरावीत शिकत होती सध्या ती बारावीची तयारी करीत होती महाविद्यालयातील हॉस्टेलमध्ये ती राहत होती मंगळवारी सायंकाळी होस्टेलमध्ये कोणीही नसताना तिने चिट्टी लिहून गळफास घेऊन आत्महत्या केली हा प्रकार निदर्शनात येतात तिच्या हॉस्टेल वरील काही विद्यार्थिनी महाविद्यालयाचे संबंधितांना माहिती कळवली आणि ही माहिती पोलिसांना देण्यात आली. कुटुंबीय आणि नातेवाईकांनी याची माहिती मिळताच तेही घटनास्थळी धाव घेतली दरम्यान आम्ही येईपर्यंत फास काढण्यात येऊ नये अशी जणू तंबी नातेवाईकांच पोलिसांना दिली होती.
पोलिसांनी तिचा फास काढून तिची उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला मात्र नातेवाईकांनी या प्रकरणात संबंधितावर कारवाई व्हावी अशी मागणी करत महाविद्यालयासमोरील रस्त्यावर आंदोलन सुरू केले पोलिसांनी बराच वेळ त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला यामध्ये जे कोणी दोषी असेल त्यावर कारवाई होईल अशी आश्वासन पोलिसांनी दिले त्यानंतर रात्री तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयाकडे पाठवण्यात आला या संदर्भात जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली .माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये अशी चिठ्ठीत उल्लेख असल्याचे सांगण्यात आले.
0 Comments