Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव: सावधान उष्णतेची लाट, सर्दी ताप उष्माघाताचा धोका नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज तापमानाचा पारा 41 अंशावर

धाराशिव: सावधान उष्णतेची लाट, सर्दी ताप उष्माघाताचा धोका नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज तापमानाचा पारा 41 अंशावर


धाराशिव: जिल्ह्यात चैत्र महिन्यातच वैशाखातील वनवा जाणू लागला आहे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने तापमानाचा पारा 41 अंशापर्यंत वाढला आहे; वाढत्या उन्हामुळे जनजीवनावर ही विपरीत परिणाम होत आहे दरम्यान वाढत्या तापमान व वातावरणातील बदलामुळे रुग्ण आजारी पडण्याची प्रमाण वाढले आहे उष्माघात ताप सर्दी किडनी स्टोन सारखे आजार उद्भवण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून नागरिकांनी देखील आवश्यक ती दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे सकाळी दहा वाजेपासूनच उन्हाचा चटका जाणवत आहे दुपारी बारानंतर तर रस्त्यावरून फिरणे मुश्किल होत आहे. गत तीन ते चार दिवसापासून तापमानात मोठी  वाढ झाली आहे तापमानाचा पारा  38 अंशापासून थेट 41 अंशापर्यंत वाढत आहे.वाढत्या तापमानामुळे जनजीवनावर देखील विपरीत परिणाम झाला आहे वाढत्या उन्हामुळे दुपारी 12 नंतर रस्ते ओस पडलेले दिसत आहेत. वाढत्या उन्हामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण देखील वाढली आहे यामध्ये लहान मुलांसह वृद्ध महिलेची संख्या मोठी आहे ताप सर्दी खोकला डोकेदुखी अंगदुखी आदी आजाराने अनेक रुग्ण ग्रस्त आहेत शासकीय व खाजगी रुग्णालयातील ओपीडीतही रुग्णसंखेत मोठी वाढ झाली आहे वाढत्या तापमानामुळे उष्माघातांस किडनी स्टोन आजारातही धोका आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.

आरोग्य विभाग सतर्क

वाढत्या तापमानाचे अनुषंगाने आरोग्य विभाग सतर्क झाले आहे जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कोल्ड रूमची व्यवस्था केली आहे ग्रामीण भागात ज्या ठिकाणी कोलरूमची व्यवस्था नाही त्या ठिकाणचे आरोग्य केंद्रात दोन विशेष बेडची व्यवस्था केली आहे सर्व ठिकाणी पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था केली आहे आवश्यक त्या औषधांचाही देखील मुबलक साठा आरोग्य विभागाकडे उपलब्ध करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.

असा करा रोगराई पासून बचाव

नागरिकांनी उन्हाळ्यात रोगराईपासून दक्षता घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवणे आवश्यक आहे तीव्र उन्हात फिरणे काम करणे टाळावे उन्हात जायची वेळ आली तर डोक्यावर उन्हापासून बचाव करण्यासाठी टोपी रुमाल घ्यावा. सुती व पांढऱ्या कपड्याचा वापर करावा दिवसातून किमान साडेतीन ते चार लिटर पाणी प्यावे उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी लिंबू सरबत नारळ पाणी कैरीचे पने फळांचा ज्यूस प्यावा असे तज्ञ सांगतात

आरोग्याची काळजी घ्या

वाढत्या तापमानाचा अनुषंगाने नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी ताप थकवा मळमळ अथवा कोणताही आजार जाणवल्यास नजीकच्या रुग्णालयात जाऊन औषध घ्यावेत अशी आव्हान जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ.  धनंजय चाकूरकर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.  सतीश हरिदास यांनी केली आहे.

मुतखड्याचा धोका

उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे घाम जास्त येतो शरीर डिहायड्रेट होते पुरेसे पाणी न मिळाल्यामुळे लघुशंका दाट होते त्यामुळे कॅल्शियम ऑक्सिडेंट सारख्या खनिजाचा खडे तयार करण्यासाठी पोषक वातावरण तयार होते. त्यामुळे उन्हाळ्यात किडनी स्टोनचा आजार उद्भवतो किडनी स्टोन असलेल्या रुग्णांनी  काळजी घेणे आवश्यक आहे लघवी रोखून ठेवू नये पाणी भरपूर पिणे आवश्यक असल्याचे त्यांनी  सांगितले. .

Post a Comment

0 Comments