Hot Posts

6/recent/ticker-posts

ग्राहक मंचला अटक वॉरंट काढण्याचा अधिकार नाही : कोलकत्ता हायकोर्ट

ग्राहक मंचला अटक वॉरंट काढण्याचा अधिकार नाही : कोलकत्ता हायकोर्ट


कोलकाता : ग्राहक मंचला आपल्याकडे आलेल्या कोणत्याही प्रकरणात अटक वॉरंट जारी करण्याचा अधिकार नाही ग्राहक मंच फक्त ताब्यात घेण्याचे आदेश देऊ शकतात असा महत्त्वाचा निर्वाळा कोलकत्ता उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला तसेच संबंधित प्रकरणात याचिकाकरते विरोधात जारी वॉरंट रद्द केले.

जिल्हा ग्राहक मंचने जारी केलेल्या अटक वॉरंटला कोलकत्ता उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती शुभ्रा घोष यांनी ग्राहक मंचला अटक वॉरंट जारी करण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले; अशा प्रकारची कारवाई ग्राहक संरक्षण कायद्याच्या चौकटी बाहेर आहे असे न्यायमूर्तींनी म्हटले हे प्रकरण 2013 साली ट्रॅक्टर खरेदी संदर्भातील एक आर्थिक कंपनी आणि कर्जदार यांच्यातील वादाशी संबंधित आहे कर्जदाराने कंपनीचे 25 हजार 716 रुपये थकीत ठेवले होते. त्यामुळे कंपनीने त्याचे ट्रॅक्टर जप्त केले यामुळे कर्जदाराने ग्राहक मंचेकडे धाव घेत कंपनीला ट्रॅक्टर ताब्यात घेण्यासाठी निर्देश देण्याची मागणी केली होती ;यानंतर ग्राहक मंचाने कर्ज दाराकडून 25716 रुपयाची थकीत रक्कम मिळाल्यानंतर मिळाल्यानंतर ट्रॅक्टर नोंदणी प्रमाणपत्र त्याला देण्याचे आदेश दिले होते.यादरम्यान कंपनीने देखील एक प्रकरण दाखल केल्याने ग्राहक मंचने 13 सप्टेंबर 2019 रोजी याचिकाकर्ते विरोधात अटक वॉरंट जारी केली होती परंतु न्यायमूर्ती घोष यांनी ग्राहक मंचला कोणत्याही प्रकरणात अटक वॉरंट जारी करण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट करत याचिका कर्त्याला दिलासा दिला. दिवाणी प्रक्रिया साहित्या अंतर्गत फक्त ताब्यात ठेवण्यासाठी आदेश देण्याची मुभा ग्राहक मंचला असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments