तहसीलदार बनवण्याचे आमिष दाखवत महिलेला पावणे अकरा लाखाचा गंडा रोकड सोन्याच्या दागिन्यासह शासकीय योजनेच्या फार्मचे उकळले पैसे
जळगाव: मुलीला तहसीलदार बनवण्याची हमी दाखवत कल्पना आत्माराम कोळी वय (53) राहणार नेहरूनगर मोहाडी रोड यांच्याकडून ज्योती अशोक साळुंखे राहणार मनियार वाडा बालाजी मंदिरा जवळ (जळगाव) या महिलेने चार लाख बावीस हजार रुपये रोख तीन लाख रुपयांचे एकशे दहा ग्रॅम वजनाची सोन्याची दागिने आणि विविध शासकीय योजनांचे फॉर्म भरून जमा झालेले तीन लाख 51 हजार 950 रुपये असे एकूण दहा लाख 75 हजार 950 रुपये घेऊन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे याप्रकरणी महिलेविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की शहरातील मोहाडी रोड परिसरात कल्पना आत्माराम कोळी यांची मुलगी वैशाली कोळी या खंडेराव नगरात वास्तव्यास आहेत हळदी कुंकवाच्या कार्यक्रमांमध्ये त्यांची ज्योती अशोक साळुंखे या महिलेची ओळख झाली होती. त्या महिलेने कल्पना कोळी यांना माझी शासकीय कार्यालयात खूप ओळख आहे तुमच्या मुलीला किंवा मुलाला शासकीय नोकरीला लावून शकते अशी सांगितले त्याकरता त्या महिलेने तिच्या मोबाईल वरून काही लोकांशी बोलणे करून दिले होते; नोकरीला लावण्यासाठी आपल्याला काही पैसे द्यावे लागतील अशी देखील त्या महिलेने सांगितले होते. तहसीलदार बनवण्यासाठी ज्योती साळुंखे ही कल्पना कोळी यांना भेटून त्यांना आपल्याला 25 ते 30 लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले होते त्यावेळी त्यांनी सुरुवातीला तीस हजार रुपये घेतले होते; अजून थोडे पैसे लागतील असे म्हणत ज्योती साळुंखे हिने कल्पना कोळी यांच्याकडून 5 सप्टेंबर 2024 रोजी पासून ते 5 नोव्हेंबर 2024 पर्यंत चार लाख 22 हजार रुपये उकळले होते.
- मुलीला तहसीलदार बघायचे ना म्हणत एकशे दहा ग्रॅम दागिने घेतले,, ज्योती साळुंखे ही कल्पना कोळी यांच्याकडून पैसे उकळल्यानंतर तिने अजून पैशाची मागणी केली तसेच पैसे नसतील तर सोन्याचे दागिने द्या ते पुन्हा बनवता येतील तुम्हाला वैशालीला तहसीलदार झालेले पाहिजे आहे की नाही असे सांगितल्यावर नंतर कोळी यांनी त्यांच्याकडे असलेली एक चार तोळे दुसरी तीन तोळे सोन्याची पोत पाच ग्रॅमच्या साखळ्या एक तोळ्याच्या दोन अंगठ्या 16 ग्रॅमची टोंगल दोन ग्रॅमची चीफ सात ग्रॅमची पोत अशी एकूण 110 ग्रॅम सोन्याचे दागिने ज्योती साळुंखेला दिले
- पैसे दागिने परत मागितले असता दिली धमकी
- 560 महिलांनी भरलेल्या फॉर्म चे पैसे घेतले
0 Comments