Hot Posts

6/recent/ticker-posts

दिर्घ प्रतीक्षेनंतर यशस्वी आंदोलनाचे फलित; मौजे काक्रंबा येथील नवीन आरोग्य उपकेंद्र इमारत सुरू.

दिर्घ प्रतीक्षेनंतर यशस्वी आंदोलनाचे फलित;

मौजे काक्रंबा येथील नवीन आरोग्य उपकेंद्र इमारत सुरू.


"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

इटकळ (दिनेश सलगरे):- तुळजापुर तालुक्यातील मौजे काक्रंबा गावकऱ्यांच्या आरोग्याच्या गरजा लक्षात घेऊन शिवसेनेने गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करत आरोग्य नविन उपकेंद्र इमारत सुरू करण्यासाठी आंदोलन छेडले होते. या आंदोलनाला अखेर यश आलं असून, काक्रंबा येथील नविन आरोग्य उपकेंद्र इमारत आखेर जनतेसाठी खुले करण्यात आले.या उपकेंद्राच्या माध्यमातून आता गावातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवा गावातच मिळणार असून, लांबच्या दवाखान्यांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.शिवसेनेचे सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर म्हणाले की, "गेल्या अनेक वर्षांपासून उपकेंद्र बंद अवस्थेत होते. गावकऱ्यांची हेळसांड थांबावी म्हणून आम्ही आवाज उठवला आणि शेवटी प्रशासनाने उपकेंद्र सुरू केलं."

ग्रामस्थांनीही या निर्णयाचे स्वागत करत शिवसेनेचे आभार मानले असून, आता या केंद्रातून नियमित वैद्यकीय अधिकारी व सुविधा मिळाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच आरोग्य केंद्रात रिक्त असलेल्या जागा लवकरात लवकर भरण्यात यावे यासाठी शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर जिल्ह्याचे  खासदार ओमराजे निंबाळकर, पालकमंत्री प्रताप सरनाईक तसेच महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री यांना लवकरच भेटणार आहेत असे सांगण्यात आले आहे .यावेळी शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर, दीपक  भिसे, कार्तिक वाघमारे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments