Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव जिल्ह्यातील जळकोट जेवळी परिसरात गारांचा पाऊस

धाराशिव जिल्ह्यातील जळकोट जेवळी परिसरात गारांचा पाऊस


तुळजापूर : धाराशिव जिल्ह्यामध्ये मागील दोन  दिवसांपासून  वातावरण बदलले असून उकाड्यात प्रचंड वाढ झाली होती.  त्यातच आज तुळजापूर लोहारा तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसाने गारासह हजेरी लावली. तालुक्यातील जळकोट परिसरामध्ये दिनांक 10 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गारांचा पाऊस झाला. या अवकाळी पावसाने फळबागा आणि आंब्याचे मोठे नुकसान केले आहे. तसेच लोहारा तालुक्यातील जेवळी परिसरात परिसरामध्ये गारांचा पाऊस झाला आहे. गारांचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या फळबागांचे नुकसान झाले. जेवळी परिसरातील  परिसरातील गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारा बरसल्या. रब्बी हंगामातील काढणीस आलेले अंतिम टप्प्यातील पिकांना याचा फटका बसला आहे. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांना ज्वारीच्या गंज झाकण्यासाठी धावपळ करावी लागली.तर दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना  दिलासा मिळाला आहे.


Post a Comment

0 Comments