Hot Posts

6/recent/ticker-posts

Breaking | सोलापुरातील सुप्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ.शिरीष वळसंगकर यांची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या-Dr Shirish valsankar Sucide

Breaking | सोलापुरातील सुप्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ.शिरीष वळसंगकर यांची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या-Dr Shirish valsankar Sucide


सोलापूर : महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रासाठी धक्कादायक बातमी हाती आली आहे. प्रसिद्ध मेंदू विकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्या केली आहे. वळसंगकर यांनी स्वतःच्याच डोक्यात गोळी झाडून आयुष्य संपवल आहे. वळसंगकर यांच्या आत्महत्येने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. १८ एप्रिल) रोजी राञी ८.३० वाजण्याच्या सुमारास  घडल्याची माहिती असून, या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस तपास सुरू आहे.

डॉ. शिरीष वळसंगकर यांचा वैद्यकीय शिक्षण प्रवास

डॉ. वळसंगकर यांनी सोलापुरातील डीबीएफ दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्समध्ये शिक्षण घेतलं. त्या कॉलेजमध्ये त्यांनी सन्मानाने पदवी प्राप्त केली. त्यांनी विज्ञानाची पूर्व-पदवी उत्तीर्ण केली. प्री-प्रोफेशनल उत्तीर्ण केली. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण सोलापूर येथील डॉ. व्हीएम मेडिकल कॉलेजमधून पूर्ण केलं.डॉ. शिरीष वळसंगकर यांनी शिवाजी विद्यापीठ, लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियनमधून एमबीबीएस पूर्ण केलं.तसेच तिथूनच एमडी आणि एमआरसीपी पदवी मिळवली. त्यांना मराठी, कन्नड, इंग्रजी आणि हिंदी या भाषा अवगत होत्या.

Post a Comment

0 Comments