Hot Posts

6/recent/ticker-posts

Latur-अनैतिक संबंधातून तरुणाचा खुन, आरोपी महिलेची काही तासातच गळफास घेऊन आत्महत्या लातूर तालुक्यातील घटना

Latur-अनैतिक संबंधातून तरुणाचा खुन, आरोपी महिलेची काही तासातच गळफास घेऊन आत्महत्या लातूर तालुक्यातील घटना


लातूर: अनैतिक संबंधाच्या कारणावरून तरुणाचा धारदार शस्त्राने डोक्यात कोयत्याने सपासप वार करून रविवारी दिनांक 30 रोजी लातूर तालुक्यातील निर्गुण खून करण्यात आला होता. यातील सह आरोपी असलेल्या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दिनांक 31 रोजी सकाळी उघडकीस आली आहे.सदर महिलेने आत्महत्या केली की तिचा घातपात झाला याबाबत पोलीस तपास सुरू आहे. तरुणाच्या खुनातील आरोपी पैकी एकाला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की लातूर तालुक्यातील करकटा येथे अनैतिक संबंधातून गुढीपाडव्याच्या दिवशी रविवारी दिनांक 30 रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शरद प्रल्हाद इंगळे वय 40 या तरुणाचा खून झाला होता त्यातील सह आरोपी सोनट्या उर्फ रोहन बाळासाहेब शिंदे यांनी ऊस तोडणीच्या कोयत्यांनी गळ्यावर व डोक्यात सपासप वार करून त्याचा खून केला होता.

या प्रकरणात मुरुड पोलीस ठाण्यात रोहन बाळासाहेब शिंदे सह त्याला सहकार्य करणारे रोहित उर्फ दाद्या बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब भारत शिंदे ,गणेश भारत शिंदे व सखुबाई बाळासाहेब शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी गणेश भारत शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे दरम्यान सोमवारी दिनांक 30 रोजी सकाळी सहा वाजता करकटा येथील वनीकरणाच्या जागेत संशयित आरोपी महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांना समजले; पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.मुरुड पोलीस ठाण्यात याबाबत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मुरुड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. सदरील महिलेने आत्महत्या केली आहे की तिचा घातपात घडला आहे याबाबतही पोलीस तपास करीत आहेत कालच्या खून प्रकरणात तपास अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी लातूर ग्रामीणच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

दरम्यान मयत शरद इंगळे यांच्या पार्थिवावर सोमवारी दिनांक 30 रोजी करकट्टा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या महिलेवर लातूर येथे महिलेच्या नातेवाईकांनी अंत्यसंस्कार केले 2000 वस्ती लोक  असलेल्या करकट्टा या छोट्याशा गावात दोन दिवसात घडलेल्या खून आत्महत्या सारख्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments