Hot Posts

6/recent/ticker-posts

अकरावी प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन नोंदणी बुधवारपासून, आज उद्या विद्यार्थ्यांना सरावाची संधी! वेळापत्रक बदल

अकरावी प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन नोंदणी बुधवारपासून, आज उद्या विद्यार्थ्यांना सरावाची संधी! वेळापत्रक बदल


पुणे: इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यभरातील 9294 कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली असून विद्यार्थ्यांना बुधवार 21 मे पासून ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाने वेळापत्रक बदल केला असून सोमवार दिनांक 19 व मंगळवार दिनांक 20 मे रोजी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचा सराव करता येणार आहे.पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना 6 ते 12 जून या कालावधीत प्रत्यक्ष प्रवेश घेता येणार आहे.

अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी https: mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळाची निर्मिती करून त्यावर कनिष्ठ महाविद्यालयांना नोंदणीसाठी 15 मे पर्यंत ची मुदत देण्यात आली होती तर विद्यार्थ्यांची नोंदणी 19 मे पासून सुरू करण्याची जाहीर झाले मात्र वेळापत्रकात बदल करण्यात आला असून विद्यार्थ्यांना 21 मे पासून अर्ज नोंदणी करता येईल.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार अकरावीच्या प्रवेशाची पहिली फेरी 21 मे पासून सुरु होणार आहे त्यात 21 ते 29 मे कालावधीत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे.तसेच कनिष्ठ महाविद्यालयांचे किमान एक ते कमाल दहा प्राधान्यक्रम नोंदवता येणार आहेत ऑनलाईन नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना शंभर रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

Post a Comment

0 Comments