कळंब :येथील उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील कर्मचारी तीन हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ अटक
धाराशिव: शेतजमिनीची मोजणी केलेली हद्द खुणा कायम करण्यासाठी उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय कळंब येथील कर्मचारी यांनी पाच हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंति पंचा समक्ष ३ हजार रुपयाची लाच घेताना एसीबी पथकाने रंगेहात अटक केली आहे.या कार्यालयातील गैरव्यवहारांचे वाभाडे निघूनही निर्ढावलेल्या कर्मचाऱ्यांची पैशाची हाव सुटली नसल्याचे शुक्रवारी लाचखोरावर झालेल्या कारवाईतून उघड झाले.
याबाबत एसीबी कडून मिळालेली अधिक माहिती अशी की, उपाधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय कळंब येथील निमतानदार राजू गंगाराम काळे वय 54 वर्षे, यांना तक्रारदार यांचे नावे असलेल्या शेत जमीन गट न. 239 मधील शेत जमिनीची हद्द कायम मोजणी करणे बाबत उप अधिक्षक भूमी अभिलेख कळंब जिल्हा धाराशिव यांचे कार्यालयात अर्ज दिला होता. त्यावरून तक्रारदार यांचे शेत जमिनीची मोजणी दिनांक 08/05/2025 रोजी भूमी अभिलेख कार्यालयातील लोकसेवक काळे यांनी केली. त्यानंतर हद्द कायमच्या खुणा करण्यासाठी लोकसेवक काळे हे तक्रारदार यांचेकडे 5000/- रुपये लाच मागणी करत असलेबाबत काल दिनांक ०८/०५/२५ रोजी तक्रारदार यांनी समक्ष ला प्र वि धाराशिव येथे येवुन तक्रार दिली होती.
त्यानुसार तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून आज दिनांक 09/05/25 रोजी लोकसेवक काळे यांची शिवाजी चौक कळंब येथे पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता लोकसेवक काळे यांनी तक्रारदार यांचे शेत जमिन मोजणीच्या हद्द कायम खुणा करण्यासाठी पंचासमक्ष 5,000/- रुपयेची लाच मागणी करुन तडजोडी अंती पहिला हप्ता 3,000/- रु. लाच रक्कम स्विकारण्याचे मान्य केले.यातील आलोसे याने आज दिनांक 09/05/2025 रोजी सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार यांचेकडून पंचासमक्ष 3000/-रुपये लाच रक्कम स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. यातील आरोपी याचेविरुध्द कलम 7, भ्र.प्र.अधिनियम 1 1988 अन्वये पोलीस ठाणे कळंब जि. धाराशीव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे. हा सापळा पथक यशस्वीसाठी सापळा अधिकारी श्री नानासाहेब कदम,पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव ,सिध्दाराम म्हेत्रे,पोलीस उप-अधीक्षक,श्री संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, श्री मुकुंद आघाव, अपर पोलीस अधीक्षक,पोलीस अंमलदार- सिद्धेश्वर तावसकर, शशिकांत हजारे, आशिष पाटील, जाकेर काझी. यांचा समावेश होता.
▶️ आरोपीचे अंगझडतीत मिळुन आलेल्या वस्तुः-
1) लाच रक्कम रुपये 3000/-
2) लाच रकमे व्यतिरिक्त 7620/- रुपये रोख रक्कम
3) एक 5 ग्रॅम वजनाची पिवळ्या धातूची अंगठी
4) तक्रारदार यांची शेत मोजणी कागदपत्राची फाईल.
5) एक Vivo कंपनीचा मोबाईल.
6) एक Asus कंपनीचे लॅपटॉप
▶️ आरोपीची घरझडतीः- आरोपीची घरझडती सुरु आहे.
▶️ इतर माहितीः- यातील आरोपी याचेविरुध्द कलम 7, भ्र.प्र.अधिनियम 1988 अन्वये पोलीस ठाणे कळंब जि. धाराशीव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु असुन आरोपीस अटक करून पुढील तपास करण्याची तजवीज ठेवली आहे.
▶️ आरोपी याचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला असुन पुढील निरीक्षण करुन तपास करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे.
भ्रष्टाचारा संबंधित काही तक्रार असल्यास
टोल फ्री क्र:- 1064
पोलीस अधीक्षक, लाप्रवि छत्रपती संभाजी नगर:- 9923023361 व पोलीस उप अधीक्षक 9594658686 यावर संपर्क साधावा.
0 Comments