Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर: शहरासाठी स्वच्छ पाणीपुरवठा व व घंटागाडी नियमीत सुरू करा राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटकचे जिल्हाध्यक्ष मधुकर शेळके यांची निवेदनाद्वारे मागणी

तुळजापूर शहरासाठी स्वच्छ पाणीपुरवठा व व घंटागाडी नियमीत सुरू करा राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटकचे जिल्हाध्यक्ष मधुकर शेळके यांची निवेदनाद्वारे मागणी


धाराशिव - तुळजापूरवासीयांचा जिव्हाळ्याचा व मूलभूत असा पाणी प्रश्न घंटागाडी स्वच्छतेसह विविध प्रश्नांवर राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटकचे जिल्हाध्यक्ष मधुकर शेळके यांनी दि,९ रोजी नगरपालिका प्रशासनाला निवेदनाद्वारे मागणी केली आहे .

या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, तुळजापूर शहरवासीयांना प्रचंड त्रासाची अवहेलना नगरपरिषद प्रशासनाकडून सुरू होत असून दोन ते तीन महिन्यापासून व अस्वच्छता  पाणी शहरात सोडण्याचा महाप्रताप नगर परिषद करत असून तो तत्काळ थांबवा व शहरवासीयांना किमान दोन दिवसाला स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात यावा त्याचबरोबर शहरात कचरा गोळा करण्यासाठी नियमित घंटागाडी फक्त नावालाच आहे की काय असे वाटते नियमित आढळून येत नाही तरी दररोज नियमित घंटागाडी तात्काळ सुरू करण्यात यावी शहरात जागोजागी असलेले कचऱ्याचे ठिकाणी उचलण्यात यावे तसेच कचरा कचराकुंडी जागोजागी ठेवण्यात यावे. शहरातील नाल्या स्वच्छता करण्यात याव्या अशी मागणी इंटक जिल्हाध्यक्ष श्री मधुकर शेळके यांनी नगरपरिषद व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केलेली आहे.



Post a Comment

0 Comments