लग्नाची हळद उतरण्याअगोदरच बीडची नवरी लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी प्रियकरासोबत भुर्रर्र,
बीड: लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू आपल्या माहेरच्या गावातून चक्क प्रियकरासोबत पळून गेल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे .दि,९ मे रोजी केज तालुक्यातील एका मंगल कार्यालयात झालेल्या या विवाह सोहळ्यात तालुक्यातील अनेक मान्यवर नेत्यांनी उपस्थिती लावली होती व नव दाम्पत्याला शुभ आशीर्वादही दिले होते.
शुक्रवारी दुपारी केज तालुक्यातील एका खेडेगावातील नववधूचे शुभमंगल झाले. लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच्या दिवशी नवदांपत्याने जोडीने देवदर्शनही केले त्यानंतर रविवारी तिला मुराळी पाठवून येती- जातीसाठी माहेरी नेण्यात आली मात्र त्याच रात्री या नववधुने रात्री नैसर्गिक विधीला जाण्याच्या बहाण्याने भावजईचा मोबाईल घेतला आणि माहेरच्या गाव शेजारीच असलेल्या प्रियकराशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. त्यानंतर उन्हाळ्याचे दिवस असल्याने ती एकटीच घरात झोपली व तिचे इतर सर्व नातेवाईक अंगणात झोपी गेले. सोमवारी पहाटे नवरी मुलगी झोपलेल्या घरातील वीज बंद असल्याचे तिच्या आईला दिसून आले त्यामुळे तिने घरात जाऊन पाहिले असता मुलगी आढळून आली नाही नंतर जवळच्या सर्व नातेवाईकाकडे तिचा शोध घेतला असता नववधू कोणाकडेही आढळी नाही अखेर भावाने केज पोलीस ठाण्यात नववधू असलेली बहीण हरवल्याची तक्रार सोमवारी दिली.
दागिने मंगळसूत्रासह पोबारा
या नववधोनी प्रियकरासोबत पळून जाताना सासरच्या मंडळीने लग्नात घातलेली झुंबर मंगळसूत्र व इतर दागिन्यास स्वतःची एटीएम कार्ड क्रेडिट कार्ड आणि मोबाईलसह केला आहे या घटनेमुळे तालुक्यातील एकच खळबळ उडाली आहे.
0 Comments