Hot Posts

6/recent/ticker-posts

राज्यात पावसाचा जोर कायम राहणार ; हवामान खात्याचा अंदाज कोकणात रेड अलर्ट

राज्यात पावसाचा जोर कायम राहणार ; हवामान खात्याचा अंदाज कोकणात रेड अलर्ट


पुणे: राज्यात पाऊस सुरू असून कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक आहे शुक्रवारी कोकणात रेड अलर्ट असून वादळी वाऱ्यास मुसळधार पाऊस पडणार आहे .तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात ऑरेंज अलर्ट  असून जोरदार पावसाचा इशारा आहे विदर्भ मराठवाड्यात ही पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मान्सून दक्षिण अरबी समुद्र मालदीव बंगालच्या उपसागराचा काही भाग तर श्रीलंकेचा बहुतांशी भाग व्यापला आहे ;मान्सूनचा मुक्काम गुरुवारी याच भागात होता येत्या रविवार पर्यंत केरळमध्ये पोहोचेल पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये दक्षिण अरबी समुद्राची आणखी काही भागात प्रगती करेल मालदीव आणि कोमोरिंचा उरलेला भागही व्यापील आणि लक्षद्वीप केरळ ,तामिळनाडू आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये काही भागातही मान्सून दाखल होईल बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग मान्सून पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये व्यापील असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला  आहे.

पूर्व मध्य अरबी समुद्रात कोकण आणि गोवा किनारपट्टीवर कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे या कमी दाब क्षेत्राची तीव्रता जास्त वाढवण्याची शक्यता आहे यामुळे राज्यातील अनेक भागात पावसाला पोषक हवामान आहे गुरुवारी सायंकाळपर्यंत कोल्हापूर येथे 13 मीमी महाबळेश्वर 18 सांगली पाच सातारा 15 मुंबई 0.6 मिमि अलिबाग 3 मीमी रत्नागिरी 49 मिमी इतक्या जोरदार पावसाची नोंद झाली आहे विदर्भातील चंद्रपूर 19 वाशिम 3 मिमी व यवतमाळ येथे 7 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग येथे रेड अलर्ट असून मुसळधार पावसाची शक्यता आहे ठाणे अहिल्यानगर पुणे कोल्हापूर सातारा परभणी बीड नांदेड लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments