Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथील निसर्गरम्य रामलिंग धबधबा वाहू लागला

धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथील निसर्गरम्य रामलिंग धबधबा वाहू लागला


धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील निसर्गरम्य पर्यटन स्थळ असलेल्या रामलिंग धबधबा ओंसाडुन वाहू लागला आहे. विशेष म्हणजे दरवर्षी जून महिन्यात वाहणारा हा धबधबा यावर्षी लवकर सुरू झालेल्या पावसाने मे महिन्याच्या अखेरीस सुरू झाला आहे. मराठवाड्याचे मिनी महाबळेश्वर म्हणून ओळख असलेले हे ठिकाण पावसाळा सुरू झाल्यानंतर भाविकांनी आणि पर्यटकांनी गजबजुन जाते. येथे श्रावण महिन्यात भरलेल्या यात्रेनिमित्त भाविक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात येथील ऐतिहासिक महादेवाच्या मंदिराची दर्शन घेण्यासाठी दूरवरून भाविक येतात तसेच निसर्गप्रेमी पर्यटकांना हा रामलिंग मंदिराचा परिसर नेहमी खुणावतो.

प्रभू श्रीरामाच्या वास्तव्याने पावन झालेला हा परिसर भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखला जातो. सीता मातेला तहान लागल्यानंतर प्रभू श्रीरामाने  बाण मारून पाणी काढले अशी आख्यायिका  प्रसिद्ध आहे. निसर्गरम्य रामलिंग मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांनी तसेच पर्यटकांनी या ठिकाणी प्लॅस्टिक कचरा केल्यामुळे हा परिसर दुषीत होतो हा प्लॅस्टिक कचरा वाऱ्याने डोंगराच्या कड्या कपारीत जाऊन बसतो तो काढणे खूप अवघड होऊन जाते तसेच या कचऱ्यामुळे येथील माकडांचे वन्य प्राण्यांचे आरोग्य धोक्यात येते त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांनी पर्यटकांनी प्लास्टिक कचरा करू नये अशी आव्हान रामलिंग देवस्थान समिती आणि निसर्गप्रेमी नागरिकांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments