महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटनेच्या धाराशिव जिल्हाध्यक्ष पदी अब्दुल शेख यांची निवड
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""
इटकळ (दिनेश सलगरे):- मौजे इटकळ येथील सामाजिक कार्यकर्ते अब्दुल शेख यांची महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड. महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नदीम शफी मुजावर यांनी संघटनेचे माध्यमातून सर्व सामान्य नागरिकांचे कामे करता यावी यासाठीच या संघटनेची स्थापना केली आणि नुकतीच धाराशिव जिल्हाध्यक्ष पदी मौजे इटकळ येथील सामाजिक कार्यकर्ते अब्दुल शेख यांची नियुक्तीपत्र देवून निवड केली आहे . सामाजिक कार्यकर्ते अब्दुल शेख हे गेल्या दहा वर्षांपासून नेहमीच गाव परिसरात सर्व सामान्यांच्या न्याय हक्कासाठी धडपडत असतात. म्हणूनच त्यांच्या कामाची दखल घेत महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नदीम मुजावर यांनी सामाजिक कार्यकर्ते अब्दुल शेख यांची धाराशिव जिल्हाध्यक्ष पदी निवड केलेली आहे. अब्दुल शेख यांची महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटनेच्या धाराशिव जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याने गाव परिसर व जिल्हा भरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
0 Comments