सोलापुर : शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून सोलापूर जिल्ह्यातील घटना
सोलापूर: शेतीच्या वहिवाटीच्या कारणावरून जन्मदात्या वृद्ध आईची मुलगा सून व व्याही यांने मिळून संगणमताने हत्या केल्याची धक्कादाय घटना 30 मे रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मुंगशी तालुका माढा येथे घडली यामध्ये लक्ष्मी उर्फ शोभा नारायण महाडिक वय 62 असे खून झालेल्या वृद्ध आईचे नाव आहे. याबाबत मारुती रामा रेवडे राहणार रेवडी वस्ती अनाळा तालुका परंडा जिल्हा धाराशिव यांनी दिलेल्या प्रथम फिर्यादीवरून मताचा मुलगा दत्तात्रय नारायण महाडिक सून रजनी दत्तात्रय महाडिक दोघे राहणार मुंगशी तालुका माढा रजनी दत्तात्रेय महाडिक दोघे राहणार मुंगशी तालुका माढा व्याही धर्मराज बागल राहणार ब्रह्म गाव तालुका परंडा जिल्हा धाराशिव या तिघांवर गुन्हा दाखल झाला असून आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या घटनेची अधिक माहिती अशी की मयत वृद्ध महिला ही फिर्यादीची आत्या असून तिला आगळ गावात आठ एकर शेत जमीन आहे. फिर्यादीच्या मयत आत्याला एक मुलगा व मुलगी आहे मुलगी कल्पना धनाजी ढेरे ही विवाहित असून सध्या ती ऑस्ट्रिया या देशात नोकरी निमित्त वास्तव्यास आहे. मयताचे पतीचेही दहा महिन्यापूर्वी निधन झाले आहे आरोपी मुलगा व सून हे दोघे पक्क्या घरात राहतात तर मयत महिलेचे सुनीशी पटत नसल्याकारणाने घराशेजारीच एका पत्राचे शेडमध्ये राहत होती. शेतीच्या वहिवाटीवरून मयत महिला तिचा मुलगा व सून यांच्यात वारंवार वाद होत असल्याचे फिर्यादीची आत्या व तिच्या मुलीने फिर्यादीला सांगितले होते. सहा महिन्यापूर्वी आरोपी मुलगा व सून आणि सुनेचे वडील यांनी शेतीच्या वहिवाटीच्या कारणावरून उसाच्या सरीत महिलेला मारहाण केली होती.
मुलींनी केला कॉल आई.... शेतात रक्ताच्या थारोळ्यात
फिर्यादीला ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या मयत महिलेच्या मुलीचा व्हाट्सअप वर कॉल आला तिने सांगितले की माझी आईला शेतामध्ये मारून टाकले आहे तू जाऊन बघ मग फिर्यादी आनाळा तालुका परंडा येथून मुंगशी येथे आत्या शोभा हिच्या घरी रात्री अकरा वाजता आला. मयताच्या घराजवळ लोक जमले होते उसाच्या शेतामध्ये जाऊन पाहिले असता उसाच्या सरीमध्ये आत्या शोभा ही रक्ताच्या थारोळ्या जखमी अवस्थेत पडलेली होती तिच्या डोळ्यातून रक्त येत होते तिचा गळा कपड्याने आवडलेला होता व तोंडावर डोक्यावर दगडाने मारून जीवे ठार मारले होते असे फिर्यादीत नमूद करण्यात आली आहे.
माढा न्यायालयासमोर रविवारी केली हजर,व्याहीच्या समावेश याबाबत मात्र पोलिसांकडून चौकशी सुरूच !
ऑस्ट्रेलिया येथे सॉफ्टवेअर इंजिनियर असलेली मुलगी कल्पना धनाजी ढेरे ही रविवारी मायदेशी परतल्यानंतर कुर्डूवाडी येथे पोलीस ठाण्यात आली त्यानंतर तिने शित पेटीत ठेवलेले आईचे शव पोलिसांकडून ताब्यात घेऊन मुंगशीत नेऊन स्वतःच पार्थिवाला अग्नी देत अंत्यसंस्कार केले. यावेळी नातेवाईक गावकरी उपस्थित होते तर आरोपी मुलगा व सून यांना यादरम्यान पोलिसांनी माढा न्यायालयासमोर उभे केले होते, तिसरा संशयित आरोपी व्याही धर्मराज बागल राहणार ब्रह्मगाव तालुका परंडा जिल्हा धाराशिव हा अध्यापही पोलिसांच्या ताब्यात असून त्यांच्या हद्दीतील प्रत्यक्ष सहभागाबाबत मात्र पोलीस अधिकची चौकशी करत आहेत.
0 Comments