तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे सैन्य दलात निवड झाल्याबद्दल प्रवीण झिंगरे यांचा सत्कार
चिवरी : तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील शेतकरी कुटुंबातील प्रवीण हनमंत झिंगरे यांची नुकतीच भारतीय सैन्य दलामध्ये निवड झाली आहे. याबद्दल गावातील आजी-माजी सैनिकांतर्फे सत्कार करण्यात आला, तसेच दहावीच्या शालांत परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.यावेळी सैनिक फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जावळे, कार्याध्यक्ष अशोक गाडेकर ,तुळजापूर तालुका अध्यक्ष, रफिक मुजावर,तालुका उपाध्यक्ष संभाजी काळजाते, धाराशिव तालुका अध्यक्ष मोहम्मद अल्ताफ ,तालुका सचिव संताजी भोसले , जिल्हा संघटक ओवाळ , कमलाकर भोसले ,अशोक गाडेकर, ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ,सदस्य , विकास सोसायटी चेअरमन सदस्य ,पोलीस पाटील, गावातील सर्व माजी सैनिक आदींसह ग्रामस्थ तरुण महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments