Hot Posts

6/recent/ticker-posts

बोरामणी येथे विहिरीचा कठडा ढासळून मृत्यू झालेल्या दोन मुलांचा मृतदेह तब्बल दहा तासानंतर सापडला

बोरामणी येथे विहिरीचा कठडा ढासळून मृत्यू झालेल्या दोन मुलांचा मृतदेह तब्बल दहा तासानंतर सापडला


सोलापुर : दक्षिण सोलापूर(Solapur) तालुक्यातील बोरामणी(Boramani) येथे दि१  रोजी विहिरीचा कठडा  कोसळल्याने पोहायला गेलेल्या पाच मुलांपैकी दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. तर ढिगार्‍याखाली अडकलेल्या दोन मुलांना काढण्यासाठी अग्निशामक दल व पोलीस प्रशासन(Police department) युद्धपातळीवर प्रयत्न करून तब्बल दहा तासानंतर दोघांची मृतदेह बाहेर काढली आहेत.

या घटनेची मिळालेली अधिक माहिती अशी की , बोरामणी येथील 5 मुले पोहण्याचा आनंद घेण्यासाठी दुपारच्या वेळेस  एका शेतकऱ्याची विहिरीवर गेले होते, विहिरीमध्ये पोहत असताना अचानक विहिरीचा कठडा कोसळल्याने यामध्ये दोन शाळकरी(School Boy) मुलांचा ढिगार्‍याखाली अडकून मृत्यू झाला होता. निकीत माने,गौरव राजगुरु (वय१२ ते१५ वर्ष) असे मयत झालेल्या मुलांची नावे आहेत. पोलीस प्रशासन तहसील प्रशासन व स्थानिक नागरिकांच्या मदतीने अखेर तब्बल दहा तासानंतर या दोन मुलांचे मृतदेह शोधण्यात यश आले आहे. मृतदेह बाहेर काढताच मुलांच्या नातेवाईकांनी टाहो फोडला होता. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा  पसरली  असून मयत मुलाच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.

Post a Comment

0 Comments