Hot Posts

6/recent/ticker-posts

पशुसंवर्धनच्या योजनांसाठी पाच वर्षे चालणार एकच अर्ज, विविध योजनांसाठी अर्ज करण्याचे पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

पशुसंवर्धनच्या योजनांसाठी पाच वर्षे चालणार एकच अर्ज, विविध योजनांसाठी अर्ज करण्याचे पशुसंवर्धन विभागाचे आवाहन


मुंबई : पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमाद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे विविध योजनांसाठी वारंवार अर्ज करण्याची गरज नसून एकदा अर्ज केल्यानंतर पुन्हा पाच वर्षे तोच अर्ज चालणार आहे.

विविध योजना या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालन शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असलेल्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजनेअंतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी नाविन्यपूर्ण योजनेमध्ये गेली सात वर्षे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे. सन 2021- 22 पासून जिल्हास्तरीय पशुसंवर्धन विषयक विविध योजनांसाठी सुद्धा सदर संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे यामध्ये शासनाने एखाद्या योजने करता अर्ज केल्यानंतर त्याला दरवर्षी पुन्हा अर्ज करावी लागू नये यासाठी तयार केलेली प्रतीक्षा यादी सन 2021 22 पासून पुढील पाच वर्षे पर्यंत म्हणजे सन 2025 26 पर्यंत लागू ठेवण्याची सोय केली आहे. त्यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून त्याची प्रतीक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल हे कळू शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबी करता नियोजन करता येणे शक्य होणार आहे.

अर्ज करण्यासाठी वेळापत्रक

दिनांक तपशील कालावधी

तीन मे ते दोन जून पर्यंत ऑनलाईन अर्ज

3 जून ते सात जून लाभार्थी निवड

25 जून ते 27 जून त्रुटी पूर्तता

28 जून ते 30 जून अंतिम पडताळणी

1 जुलै राखीव

2 जुलै पात्रता यादी

अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ

अँड्रॉइड मोबाइल एप्लीकेशन नाव महा एम्बस (Mahambs)या द्वारे आपण अर्ज करू शकता

तसेच इच्छुकांनी https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर किंवा ‘एएच-एमएएचएबीएमएस’ मोबाईल ॲपद्वारे अर्ज करावा

अर्ज करण्याचा कालावधी: 2 मे ते 1 जून 2025 पर्यंत

फक्त सोमवार ते शनिवार सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत अर्ज स्वीकारले जातील

टोल फ्री क्रमांक 19 62

या योजनेसाठी निवड प्रक्रिया

नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गाई म्हशीचे गट वाटप करणे शेळी मेंढी गट वाटप करणे 1000 मांसल कुक्कुट पक्षाच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्यतेने 100 कुक्कुट पिलांचे वाटप व 253 तेलंगा गट वाटप या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन 2025 -26 या वर्षात राबवली जाणार आहे.

शेतकऱ्यांसाठी विशेष सूचना

पशुपालकांनी अर्ज भरण्याकरता स्वतःचे मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा अर्ज भरताना अर्जदाराने नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठवण्यात येणार आहे असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदारांनी योजनेअंतर्गत आपला मोबाईल क्रमांक बदलणे व मागील वर्षी अर्ज केलेल्या अर्ज आणि पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

अडचणीसाठी करा संपर्क

या योजनेअंतर्गत अधिक माहितीसाठी वरील तक्त्यात दर्शवलेल्या टोल फ्री क्रमांक वर किंवा तालुक्याची पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती जिल्हा परिषद संवर्धन अधिकारी अथवा उपयुक्त कार्यालय तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वोच्च चिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा अशी आव्हान पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments