चपातीत विष घालून विवाह तिला मारण्याचा प्रयत्न सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल लातूर जिल्ह्यातील घटना-
लातुर : माहेरून पैसे घेऊन ये असे म्हणून सासरच्या मंडळींनी विवाहतिला शारीरिक व मानसिक त्रास दिला पिडीतेचे हात पाय धरून तिला मारण्याच्या उद्देशाने विषारी औषधाची चपाती तोंडात घालून घास घेण्यास भाग पाडले या प्रकरणी सासरच्या चार जनाविरुद्ध उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की फिर्यादी नवीन शेख राहणार आझाद नगर उदगीर यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींनी संगणमत करून पीडित विवाहितेला माहेरून पैसे घेऊन ये म्हणून मानसिक व शारीरिक त्रास दिला शनिवार दिनांक 17 मे रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आरोपी फरीद आरिफ शेख ,शहीद फरीद शेख ,रहीम उनिसा अतुर, रहमान शेख ,आरिफ शेख सर्व राहणार जळकोट रोड उदगीर यांनी फिर्यादीची हातपाय घट्ट धरून जीवे मारण्याच्या उद्देशाने विषारी औषध घातलेली चपाती जबरदस्तीने फिर्यादीच्या तोंडात कोंबले. फिर्यादीचे नाक दाबून घास गिळण्यास भाग पाडले तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला अशा आशयाचा जबाब पीडित व्यक्तीने पोलिसांना दिला आहे त्यावरून आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 167/ 25 कलम 109 85 352 351 (2) 3 3 5 बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक तारू करत आहेत.
0 Comments