एपीके फाईल उघडतात खात्यातून सात लाखाची रोकड लंपास आरटीओचेही बनावट साईट उघडकीस
पुणे: प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) RTO नावाने आलेली वाहतूक नियम भंगाचे चलन उघडतात महिलेचा मोबाईल हॅक करून सायबर चोरट्याने बँक खात्यातून सात लाख रुपयांची रुपये चोरून नेण्याचा प्रकार नुकताच उघडकिस आला. त्यामुळे अन्य शासकीय कार्यालयाप्रमाणेच आरटीओचेही बनावट साईट सायबर भामट्याने तयार केली असल्याची प्राथमिक पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे.या संदर्भात एका महिलेने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे सायबर चोरट्याने महिलेच्या मोबाईल क्रमांकावर गेल्या महिन्यात 21 मे रोजी एपीके फाईल्स पाठवली होती या फाईलवर प्रादेशिक परिवहन विभाग आरटीओ ट्रॅफिक चलन असा उल्लेख होता.त्यामुळे या महिलेने ही फाईल त्वरित उगवली त्यानंतर लगेच या महिलेचा मोबाईल हॅक झाला आणि या महिलेच्या बँक खात्याची गोपनीय माहिती सायबर भामट्याने काढून घेतली त्यानंतर काही मिनिटातच तिच्या खात्यातून भामट्याने सात लाख रुपयांची रोकड स्वतःच्या खात्यात वळवली . यापूर्वी महानगरपालिका महावितरण आणि अन्य विभागाच्या तसेच निरनिराळ्या बँकांच्या बनावट साईट च्या माध्यमातून चोरट्याने अनेक नागरिकांना गंडा घातला आहे त्यामुळे या स्वरूपाची व्यवहार करताना खबरदारी बाळगावी अशी आव्हान पोलिसांनी केली आहे.
0 Comments