Hot Posts

6/recent/ticker-posts

राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप,शहर काँग्रेसचा उपक्रम

राहुल  गांधींच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप,शहर काँग्रेसचा उपक्रम



धाराशिव राशिव/ प्रतिनिधी रूपेश डोलारे:     विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आज धाराशिव येथे शहर काँग्रेसच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.शहरातील गाजी हायस्कूल तसेच भारत विद्यालय या दोन शाळेत हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष विश्वासराव शिंदे, ज्येष्ठ नेते उस्मान कुरेशी, जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, जनता बँकेचे संचालक आशिष मोदानी, वरिष्ठ उपाध्यक्ष सय्यद खलील सर, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, जिल्हा सरचिटणीस जावेद काझी, युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर, ओबीसी विभागाचे प्रमुख धनंजय राऊत, मूहिब शेख, अलीम (एल.डी.) शेख, जिल्हा सरचिटणीस अशोक बनसोडे, भारतयात्री सरफराज काझी, कानिफनाथ देवकुळे, अलिमोद्दीन शेख, फारुक हुसैन सय्यद, शम्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष लाईक अहमद शेख, संचालक लईक सरकार, गाजी हायस्कूल मुख्याध्यापक रेश्मा काझी मॅडम, भारत विद्यालय मुख्याध्यापक धुमरे सर, मानवाधिकार विभागाचे प्रभाकर लोंढे, अभिमान पेठे, महिला काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष तनुजा हेड्डा, मुजम्मिल काझी, महादेव पेठे, आरेफ मुलाणी, कफिल सय्यद, इम्रान हुसेनी आदी उपस्थित होते.गाजी स्कूल येथील कार्यक्रमाचे प्रास्ताविक सय्यद खलील सर यांनी केले. सूत्रसंचलन सोहेल शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन adv. जावेद काझी यांनी मानले.

तर भारत विद्यालय येथील कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश राजेनिंबाळकर यांनी केले. सूत्रसंचलन महेश क्षीरसागर सर यांनी तर आभार प्रशांत पाटील यांनी मानले.या कार्यक्रमात १२वी तसेच नीट परीक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ही गौरविण्यात आले.

Post a Comment

0 Comments