सोलापूर उमरगा राष्ट्रीय महामार्गावर येणेगुर जवळ शाळकरी दोन सख्ख्या बहिणींना टेम्पोने उडवले, दोघी गंभीर जखमी
संतप्त नागरिकाकडून महामार्गावर रास्ता रोको
धाराशिव: महिनाभराच्या सुट्टीनंतर शाळेचा पहिला दिवस शाळेतून घरी परतत असताना महामार्ग ओलांडताना एका भरदार टेम्पो ने धडक दिल्याने दोन सख्ख्या बहिणी गंभीर जखमी झाल्याची घटना पोलीस चौकी जवळ दि,१६ रोजी घडली आहे. या घटनेमुळे संतप्त ग्रामस्थांनी सुमारे अर्धा तास रास्ता रोको करत आपला तीव्र निषेध व्यक्त केला.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की येणेगूर येथील दहावीच्या वर्गात शिकणारी रेणुका शिवकुमार स्वामी व आठवीतील गौरी शिवकुमार स्वामी दोघी बहिणी गावातीलच कॅप्टन जोशी स्मारक विद्यालयात शिकतात उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर पहिल्याच दिवशी या दोघेही मोठे आनंदाने शाळेत गेल्या स्वागत समारंभानंतर दुपारच्या सुट्टीत या दोघी बहिणी महामार्ग ओलांडून घरी जात असताना भरधाव टेम्पो ने Mh-12 जे एफ ४०२९ या वाहनाने जोराची धडक दिली यात या दोघी बहिणी गंभीर जखमी झाल्या गंभीर जखमी दोघींनाही तात्काळ येंगुर प्राथमिक आरोग्य केंद्र दाखल केले प्रथम उपचारानंतर उमरगा उपजिल्हा रुग्णालयात नेले. या घटनेत रेणुकाची कमरेला मार लागला असून गौरीचा हात फ्रॅक्चर झाला आहे. त्यामुळे दोघींनीही लातूर रेफर करण्यात आले दरम्यान अपघाती घटनेनंतर येणेगूरकरांनी महामार्ग रस्ता रोको आंदोलन करून संताप व्यक्त केला.
विद्यार्थ्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
येनगूर येथील जिल्हा परिषद शाळा आणि कॅप्टन जोशी स्मारक विद्यालय या दोन्ही शाळा महामार्गाच्या डाव्या बाजूला आहेत गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी महामार्ग ओलांडावा लागतो अंडरपास पूल दूर असल्याने काही लोकांनी लोखंडी ब्यार बेरी गेट्स कापून एक शॉर्टकट रस्ता तयार केला आहे जो विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरत आहे या दुर्घटनेमुळे महामार्गावर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा येणार आहे.
यापूर्वीही केले होते आंदोलन
साधारणपणे दीड वर्षांपूर्वी याच ठिकाणी अपघाती घटना घडली होती या घटनेनंतर ग्रामस्थांनी जवळपास सहा तास रास्ता रोको आंदोलन केले तेव्हा उपाययोजना करण्याची आश्वासन दिले होते परंतु आजवर कुठल्या स्वरूपाच्या उपायोजना प्रतीक्षात उतरल्या नाहीत असे असतानाच पुन्हा अपघाती घटना घडली आहे आता तरी यंत्रेला जाईल का असा प्रश्न भेडसावत आहे.
0 Comments