Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतल्यास घरपट्टी माफ! सोलापूर जिल्ह्यातील या ग्रामपंचायतीचा महत्त्वपूर्ण निर्णय

जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतल्यास घरपट्टी माफ! सोलापूर जिल्ह्यातील या ग्रामपंचायतीचा महत्त्वपूर्ण निर्णय


सोलापूर : येत्या 15 जून रोजी नवीन शैक्षणिक वर्षापासून जे पालक आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेश घेतील असा मालमत्ता तारकांची संपूर्ण घरपट्टी माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जवळा तालुका सांगोला ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभेत ठरावा द्वारे घेतला आहे. या निर्णयाचे सोलापूर जिल्ह्यासह सांगोला तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीकडून अणुकरण करून आपापल्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेऊन प्रोत्साहन द्यावे अशी आव्हान माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

ग्रामीण भागातील सध्याचा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उपेक्षित ,वंचित ,दलित गरिबांची मुले शिक्षण घेत आहेत. या शाळांमधून आपल्या देशातील राज्यातील महापुरुषांनी शिक्षण घेऊन उच्च पदाला गवसणी घातली आहे परंतु शिक्षण क्षेत्रातील स्पर्धा लागल्यामुळे आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी पाल्यांचा ओढा खाजगी शाळांकडे वाढल्याने दिवसेंदिवस जिल्हा परिषदेच्या शाळांना घरघर लागली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाकडून पटसंख्या अभावी गाव, वाडी वस्ती दलित वस्तीतील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अशीच परिस्थिती पुढे चालू राहिल्यास जिल्हा परिषद शाळा बंद होतील की काय? अशी भीती व्यक्त होत आहे.

जवळा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ग्रामस्थांच्या सहमतीने एक मुखी ठराव घेऊन जे पालक आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतील अशा मालमत्ता धारक पालकांची संपूर्ण घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या पत्रकार परिषदेला सरपंच सज्जन माघाडे ,उपसरपंच नवाज खलिफा, विकास संस्थेचे अध्यक्ष सुनील साळुंखे , ग्रामसेवक दत्तात्रेय रसाळ ,माजी उपसरपंच बाबासाहेब इंगळे ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments