Hot Posts

6/recent/ticker-posts

वडील क्लासवन ,आई प्राध्यापिका मुलीला टाकले जिल्हा परिषद शाळेत शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलगी सानिकाचा झाला प्रवेश

वडील क्लासवन ,आई प्राध्यापिका  मुलीला टाकले जिल्हा परिषद शाळेत शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलगी सानिकाचा झाला प्रवेश


बीड/प्रतिनिधी रूपेश डोलारे  : सध्याची शासकीय परिस्थिती पाहता आजच्या पालकांचा कल दर्जेदार जिल्हा परिषद शाळा डावलुन इंग्रजी शाळा कडे आहे मात्र   देशमुख दाम्पत्य अपवाद ठरले आहे .अंबाजोगाई येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमध्ये जेष्ठ अधिव्याख्याता श्री किशन देशमुख आणि लोकनेते सुंदरराव सोळुंके विमा महाविद्यालयातील प्राध्यापक किरण तौर देशमुख यांनी आपल्या सानिका या पाच वर्षे मुलीला जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतला आहे. शहरापासून जवळ गुजरपंचशील नगर शाळेत पहिलीच्या वर्गात सोमवारी दिनांक 16 रोजी शाळेच्या पहिल्याच दिवशी त्यांची मुलगी सानिकाचा प्रवेश झाला.

सध्या दिवसेंदिवस जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या कमी होत चालली आहे सध्याची शैक्षणिक परिस्थिती असताना देशमुख दाम्पत्याचा अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे ही खूप मोठी कौतुपाची बाब मानली जात आहे. विशेष बाब म्हणजे श्री किशन देशमुख यांच्या पत्नी किरण तौर देशमुख या माजलगाव येथील लोकनेते सुंदरराव सोळुंके महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम पाहतात . सधन असताना देखील देशमुख दाम्पत्यांनी आपल्या पाच वर्षाच्या सानिका या मुलीचा प्रवेश माजलगाव शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या सावरगाव केंद्र अंतर्गत गुजर पंचशील नगर येथील शाळेत घेतला आहे तिला शाळेत येणे जाणे करण्यासाठी रिक्षाची देखील सोय त्यांनी केली आहे उच्चशिक्षित देशमुख दाम्पत्यांनी दर्जा शिक्षणावर विश्वास ठेवत जिल्हा परिषद शाळेला पसंती दिली त्यांच्या या निर्णयाने जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून कौतुक होत आहे.

मी सुद्धा जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी

इंग्रजी माध्यमापेक्षा मराठी माध्यमांच्या शाळेत दर्जेदार शिक्षण मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. इंग्रजी शाळेतील विद्यार्थी मशीन सारखे घडवले जातात. त्यामुळे लहान मुलांना मातृभाषेतून शिक्षण महत्त्वाचे आहे. माझे शिक्षण देखील जिल्हा परिषद शाळेत झाले आहे.

– श्रीकिशन देशमुख , सानिकाचे वडील


Post a Comment

0 Comments