/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> उधार दाढी कटिंग नकार दिल्याने सलून व्यवसायिकावर प्राणघात हल्ला

Hot Posts

उधार दाढी कटिंग नकार दिल्याने सलून व्यवसायिकावर प्राणघात हल्ला

उधार दाढी कटिंग करण्यास नकार दिल्याने सलून व्यवसायिकावर प्राणघात हल्ला 


धाराशिव : उधारीवर कटिंग करण्यास नकार दिल्याने सलून व्यवसायिक तरुणावर तरुणावर प्राण घातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना धाराशिव शहरात दिनांक पाच रोजी सायंकाळी घडली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पीडित तरुण ऋतुराज बालाजी मोरे वय (18) यांचा जबाब पोलिसांनी नोंदवला असून आरोपी बबलू सूर्यवंशी यांनी हल्ला केल्यानंतर ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचे जबाबत  म्हटले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की पीडित ऋतुराज मोरे यांनी रुग्णालयातून पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार तो गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मेन रोडवरील न्यू क्लासिक जेन्ट्स पार्लरमध्ये काम करत होता त्यावेळी बबलू सूर्यवंशी (राहणार सावित्री फुले सोसायटी धाराशिव) हा दारूच्या नसेत दुकानात आला माझी कटिंग कर मी पैसे देणार नाही उधार कर असे तो म्हणाला

ऋतुराज ने त्याला तुमच्यापुढे तीन गिऱ्हाईक आहेत तुमचा नंबर नंतर लागेल असे समजावण्याचा प्रयत्न केला याचा राग आल्याने बबलूने पाठीमागून ऋतुराज ला शिवीगाळ करत ढकलून दिले त्यानंतर त्यांनी खिशातून लोखंडी धारदार फायटर काढून ऋतुराज च्या मानेच्या वर, डोक्याच्या मधोमध पाठीवर वार केला या हल्ल्यात ऋतुराज गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळला आणि त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तप्रवाह वाहू लागला. हल्ला केल्यानंतर आरोपी बबलू सूर्यवंशी एवढ्यावरच थांबला नाही ; जर तू पोलिसात माझी तक्रार दिली तर तुझ्यावर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणार अशी धमकी देवुन पळुन गेला. घटनेनंतर जवळील लोकांनी ऋतुराज चे मामा आणि सलून मालक सचिन चौधरी यांना फोन करून माहिती दिली त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन ऋतुराजेला शासकीय रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी आरोपी बबलू सूर्यवंशी यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पिडीत तरुणांनी केली आहे. पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी आरोपी बबलू सूर्यवंशी यांच्या विरोधात धाराशिव शहर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम111 (1),352,351 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे सलून व्यवसायिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बातमीचा सविस्तर व्हिडिओ पहा

👇👇👇👇👇👇👇 

https://youtu.be/LJ9tvD4zI5w?feature=shared

Post a Comment

0 Comments