Hot Posts

6/recent/ticker-posts

मौजे देवसिंगा नळ येथील राजअहमद पठाण यांची धाराशिव जिल्हा शिवसेना (उ.बा.ठा.) जिल्हा सहसंघटक पदी नियुक्ती

मौजे देवसिंगा नळ येथील राजअहमद पठाण यांची धाराशिव   जिल्हा शिवसेना (उ.बा.ठा.) जिल्हा सहसंघटक पदी नियुक्ती


"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

इटकळ (दिनेश सलगरे):- मौजे देवसिंगा नळ येथील राज अहमद पठाण यांची शिवसेना उ.बा.ठा. जिल्हा सह संघटक पदी नियुक्ती.धाराशिव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी ही नियुक्ती  महत्त्वपूर्ण  मानली जात असून, राजअहमद पठाण यांची धाराशिव व तुळजापूर तालुक्यांचे जिल्हा सह संघटक म्हणून अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. ही घोषणा शिवसेना भवन, मुंबई व शिवसेनेचे मुखपत्र सामना मधून येथून करण्यात आली.राजकारणात तळमळीने आणि निष्ठेने काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करत, पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे व युवासेनाप्रमुख मा. आ. आदित्यसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने व धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर व धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख मा.आ. कैलास दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही जबाबदारी देण्यात आली आहे.राजअहमद पठाण हे गेल्या 36 वर्षांपासून शिवसेनेचा प्रचार व प्रसार ग्रामीण पातळीवर सातत्याने करत आहेत. जनसंपर्क, संघटन बांधणी, आणि सामाजिक प्रश्नांवर ठाम भूमिका घेण्यात त्यांचा अनुभव समृद्ध आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष कार्य अधिक गतिमान होईल, असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने व्यक्त केला आहे.या नियुक्तीमुळे धाराशिव व तुळजापूर परिसरात शिवसेनेच्या संघटनात्मक विस्ताराला चालना मिळेल. विशेषतः तुळजापूर तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये व युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.राजअहमद पठाण यांच्या निवडीबद्दल विविध सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रामधून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

शिवसेना म्हणजे निष्ठा, शिवसेना म्हणजे लढा – आणि राजअहमद पठाण यांच्या निष्ठेचा हा सन्मान असल्याचे मत शिवसैनिक व्यक्त करत आहेत.

Post a Comment

0 Comments